Dhule: लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या क्रुझरचा भीषण अपघात, जागेवरच 2 जणांचा मृत्यू
- Published by:Sachin S
- Reported by:Deepak Borase
Last Updated:
महिर गावाजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन क्रुझर गाडी जात होती. तामसवाडी गावाजवळ पोहोचली असता अचानक क्रुझर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाली.
धुळे: धुळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारी क्रुझर पलटी झाली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर तामसवाडी गावाजवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली. महिर गावाजवळ लग्नाचं वऱ्हाड घेऊन क्रुझर गाडी जात होती. तामसवाडी गावाजवळ पोहोचली असता अचानक क्रुझर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, महामार्गावर क्रुझरने दोन तीन पलट्या मारल्या. क्रुझरमधील २ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
advertisement
अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेतली. जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आलं, जखमींना तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. लग्न कार्यासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात झाल्यामुळे आनंदाच्या क्षणी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
Location :
Dhule,Dhule,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 4:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhule: लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या क्रुझरचा भीषण अपघात, जागेवरच 2 जणांचा मृत्यू








