advertisement

IPL 2026 : बीसीसीआयचा एक मेसेज, हार्दिकने सोडली मुंबईची साथ, दिल्लीच्या सामन्याआधी काय झालं?

Last Updated:

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी करत आहे, पण दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक खेळला नाही.

बीसीसीआयचा एक मेसेज, हार्दिकने सोडली मुंबईची साथ, दिल्लीच्या सामन्याआधी काय झालं?
बीसीसीआयचा एक मेसेज, हार्दिकने सोडली मुंबईची साथ, दिल्लीच्या सामन्याआधी काय झालं?
नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी करत आहे, पण दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक खेळला नाही, त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादव कॅप्टन म्हणून मैदानात उतरला. हार्दिक पांड्याला बरं नसल्यामुळे तो खेळत नसल्याचं सूर्यकुमार यादवने टॉसवेळी सांगितलं. दिल्लीच्या सामन्याआधी हार्दिक पांड्या दोन प्रॅक्टिस सेशनलाही आला नाही.
हार्दिक पांड्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात दुखापत नाही तर शरिराला आराम देण्यासाठी खेळत नसल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय टीम मॅनेजमेंटने आयपीएलनंतर होणाऱ्या वनडे सीरिजसाठी हार्दिकला पूर्ण 10 ओव्हर टाकायला तयार राहायाला सांगितलं आहे.
2023 नंतर झालेल्या सगळ्या आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. 2023 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा धक्का लागला. हा पराभव अजूनही टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी कटू आठवणींसारखा आहे. आता पुढचा वनडे वर्ल्ड कप 2027 साली होणार आहे, यासाठी टीम इंडियाने तयारीलाही सुरूवात केली आहे. या वनडे वर्ल्ड कपसाठी हार्दिकला वनडेमध्ये 10 ओव्हर टाकायला सांगण्यात आलं आहे.
advertisement

पांड्याचं वर्कलोड मॅनेजमेंट

2027 वनडे वर्ल्ड कपमध्ये 10 ओव्हर पूर्ण टाकण्यासाटी हार्दिक पांड्या त्याचा वर्कलोड वाढवत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार दक्षिण आफ्रिकेच्या जलद आणि उसळणाऱ्या खेळपट्टीवर हार्दिक पांड्याची बॉलिंग टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे हार्दिक त्याच्या वर्कलोडवर काम करत आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पांड्या वनडे वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, कारण दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टी जलद आणि उसळणाऱ्या आहेत. हार्दिक पांड्याला आपण 10 ओव्हर टाकू शकतो, असा विश्वास निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटला दाखवावा लागेल. वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन हार्दिककडून जास्तीत जास्त 7 ओव्हरच टाकून घेईल, पण गरज पडली तर तो 10 ओव्हरही टाकू शकतो, यासाठी त्याला तयार राहावं लागेल.
advertisement
हार्दिक पांड्याने मागच्या काही काळात त्याचा वर्कलोड वाढवला आहे, यासाठी हार्दिकने त्याच्या बॉलिंग ऍक्शनवरही काम केलं आहे, ज्यामुळे व्हेरिएशनवेळी त्याचा स्पीड कमी होता कामा नये, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : बीसीसीआयचा एक मेसेज, हार्दिकने सोडली मुंबईची साथ, दिल्लीच्या सामन्याआधी काय झालं?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement