advertisement

Nashik: वळणावर रस्ता संपला अन् घात झाला, विहिरीत Maruti xl6 कोसळण्याचं कारण आलं समोर, PHOTOS

Last Updated:
रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत कार कोसळून हसत्या-खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनं राज्यभरातील रस्ताशेजारी असलेल्या विहिरींचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
1/9
 नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दरगुडे कुटुंब एका खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी दिंडोरी शहरात आले होते. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर हे कुटुंब maruti suzuki xl6 या एमपीव्हीने घराकडे परतत होते. पण रात्रीच्या सुमारास शिवाजी नगर भागात कारच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला. आणि गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत कोसळली. या अपघातात  दरगुडे कुटुंबीयातील ९ जणांचा मृत्यू झाला.

2/9
नाशिकमधील दिंडोरी शहरात रात्री १०.२० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  रस्त्याशेजारीच काठोकाठ भरलेल्या विहिरीत ही गाडी कोसळल्यानं मोठा आवाज झाल्यानं स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले. मात्र विहिरीत पाणी असल्यानं स्थानिक  मदत करू शकले नाही.

3/9
सुरुवातीची 5 मिनिटं कार विहिरीत दिसत होती. काचा बंद असल्यामुळं कारबाहेर पडता आलं नाही. मोटार लावून विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

4/9
स्थानिकांकडून दोरखंड टाकून बचावकार्य सुरू करण्यात आलं. मात्र काही मिनिटांतच गाडी पूर्णपणे पाण्यात बुडाली. 20 मिनिटांनंतर अग्निशमन दल घटनास्थळी झाले आणि कारला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमारे 3 तासांनी गाडी बाहेर काढण्यात आली. कारमधील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

5/9
पण, ज्या ठिकाणी या कारचा अपघात झाला त्या ठिकाणचा गुगल मॅप समोर आला आहे. गुगल मॅपवर घटनास्थळाचा जुना फोटो दिसत आहे. याच मार्गावरून गाडी गेली असावी आणि वळणावर रस्ता संपला आहे त्यामुळे पुढील अंदाज न आल्यामुळे कार थेट विहिरीत कोसळली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

6/9
या अपघातात दरगुडे कुटुंबातीलरेश्मा सुनील दरगुडे  ( वय 27),  आशा अनिल दरगुडे ( वय 32),  खुशी अनिल दरगुडे (वय 14),  श्रेयस अनिल दरगुडे ( वय 11),राखी सुनील दरगुडे (वय 11),  श्रावणी अनिल दरगुडे (वय 11)
समृद्धी राजेंद्र दरगुडे ( वय 7), माधुरी अनिल दरगुडे (वय 13)
 सुनील दत्तू दरगुडे ( वय 32)  यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं इंदोरे गावावर शोककळा पसरली आहे.
या अपघातात दरगुडे कुटुंबातीलरेश्मा सुनील दरगुडे ( वय 27), आशा अनिल दरगुडे ( वय 32), खुशी अनिल दरगुडे (वय 14), श्रेयस अनिल दरगुडे ( वय 11), राखी सुनील दरगुडे (वय 11), श्रावणी अनिल दरगुडे (वय 11) समृद्धी राजेंद्र दरगुडे ( वय 7), माधुरी अनिल दरगुडे (वय 13) सुनील दत्तू दरगुडे ( वय 32) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं इंदोरे गावावर शोककळा पसरली आहे.
advertisement
7/9
 या अपघाताच्या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या घटनेतील मृतांच्या कुटुंबाला  प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे. ज्या विहिरीत कार कोसळून हा अपघात झाला तरी विहीर बुजवण्यात आली आहे.

8/9
पण, सुरुवातीला ही विहिरी झाकलेली होती.  मध्यंतरी रस्त्याचं काम झालं. त्यामुळे रस्त्याची उंची वाढली आणि विहीर ही रस्त्याच्या बरोबरी आली, असं स्थानिकांनी सांगितलं आहे.

9/9
 रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत कार कोसळून हसत्या-खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे.या घटनेनं राज्यभरातील रस्ताशेजारी असलेल्या विहिरींचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत कार कोसळून हसत्या-खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनं राज्यभरातील रस्ताशेजारी असलेल्या विहिरींचा प्रश्न उपस्थित झाला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
advertisement
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement