advertisement

IPL 2026 : मॅच 24 तासावर अन् ऑस्ट्रेलियाला पळाला कमिन्स, परत येणार का नाही? काव्या टेन्शनमध्ये!

Last Updated:

आयपीएल 2026 चा एक आठवडा होत नाही तोच सनरायजर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.

मॅच 24 तासावर अन् ऑस्ट्रेलियाला पळाला कमिन्स, परत येणार का नाही? काव्या टेन्शनमध्ये!
मॅच 24 तासावर अन् ऑस्ट्रेलियाला पळाला कमिन्स, परत येणार का नाही? काव्या टेन्शनमध्ये!
मुंबई : आयपीएल 2026 चा एक आठवडा होत नाही तोच सनरायजर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. स्पर्धा सुरू असतानाच कमिन्स घरी का गेला? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 32 वर्षांच्या पॅट कमिन्सला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून आयपीएल खेळण्यासाठी एनओसी मिळालं नव्हतं, कमिन्सच्या फिटनेसमुळे त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयपीएल खेळायला परवानगी दिली नाही.
कमिन्सला पाठीच्या दुखापतीने सतावलं होतं, त्यामुळे याच दुखापतीचं स्कॅनिंग करण्यासाठी तो ऑस्ट्रेलियाला परतला आहे. पॅट कमिन्सच्या पाठीचं स्कॅनिंग क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निश्चित केलेल्या प्रक्रियेमार्फत केलं जाणार आहे, असं वृत्त ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलं आहे. गुरूवार 2 एप्रिलला कोलकात्यामध्ये केकेआर आणि हैदराबाद यांच्यात सामना झाला, या सामन्यानंतर कमिन्स भारतातून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून परवानगी मिळाल्यानंतर कमिन्स 17 एप्रिलला पुन्हा एकदा हैदराबादच्या टीममध्ये यायची शक्यता आहे.
advertisement

कमिन्सच्या गैरहजेरीत इशान कर्णधार

पॅट कमिन्सच्या गैरहजेरीमध्ये इशान किशन सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये हैदराबादचं नेतृत्व करत आहे. इशानच्या नेतृत्वात हैदराबादने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत, यातल्या एका सामन्यात त्यांचा विजय झाला तर एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबाद दोन पॉईंट्स आणि +0.469 नेटरनरेटसह सहाव्या क्रमांकावर आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : मॅच 24 तासावर अन् ऑस्ट्रेलियाला पळाला कमिन्स, परत येणार का नाही? काव्या टेन्शनमध्ये!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement