TRENDING:

अर्थ खात्यातला मंत्रालयातील बडा मासा गळाला, सहा लाखांची लाच घेताना ACB कडून रंगेहात अटक

Last Updated:

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल झोरी, प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचखोर अधिकाऱ्यांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत आता अर्थ आणि नियोजन विभागाचा मासा गळाला लागला आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कक्ष अधिकारी विलास लाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खारघर परिसरात रंगेहात अटक केली.
एसीबीकडून अधिकाऱ्याला अटक
एसीबीकडून अधिकाऱ्याला अटक
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्याच्या बदल्यात विलास लाड याने संबंधित व्यक्तीकडे मोठ्या रकमेची मागणी केली होती. शासकीय कामासाठी अडवणूक करून लाचेची मागणी होत असल्याची तक्रार एसीबीकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत एसीबीने सापळा रचला.

६ लाख ३७ हजारांची लाच स्वीकारताना अधिकारी रंगेहात सापडला

एसीबीच्या पथकाने नवी मुंबईतील खारघर परिसरात सापळा रचला होता. यावेळी लाचेची रक्कम ६ लाख ३७ हजार रुपये स्वीकारताना विलास लाड याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. मंत्रालयातील कामासाठी अशा प्रकारे उघडपणे लाच घेण्याचे हे दुसरे मोठे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा एकदा दणका, लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईमुळे मंत्रालयातील इतर लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनातील भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पुन्हा एकदा देण्यात आला आहे.

advertisement

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्याला क्लर्कलाही काही दिवसांपूर्वी एसीबीकडून झाली होती अटक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्कला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. एसीबीने त्याला मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन अटक केली होती. मंत्रालयात खुद्द मंत्र्याच्या केबिनमध्ये शिरून एसीबीने ही कारवाई केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. मंत्र्याच्या क्लर्कला अटक करण्यात आल्यामुळे महायुती सरकारवर मोठी नामुष्की ओढावली होती.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अर्थ खात्यातला मंत्रालयातील बडा मासा गळाला, सहा लाखांची लाच घेताना ACB कडून रंगेहात अटक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल