TRENDING:

समृद्धी महामार्गच नाही तर या रस्त्यावर जातात सगळ्यात जास्त जीव, तुम्हाला माहितीय का?

Last Updated:

नागपूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर गेल्या पाच वर्षांत ८९२४ अपघात व २२४१ मृत्यू झाले असून, हे प्रमाण समृद्धी महामार्गाच्या तुलनेत पाचपट अधिक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रस्ते अपघात काही नवीन नाहीत, महामार्गावर एकतरी अपघात होतच असतो, मात्र समृद्धी महामार्गावर सर्वाधिक अपघात होतात असं म्हटलं जातं. आता त्यात नवले ब्रिजची देखील भर पडली आहे. मात्र त्याहीपेक्षा जास्त अपघात महाराष्ट्रातील आणखी एका ठिकाणी होतात. त्याची फार कुठेही चर्चा होत नाही. समृद्धीपेक्षा पाचपट अधिक अपघात नागपूर धुळे या महामार्गावर होत आहेत. महाराष्ट्रातील रस्ते अपघातांवरून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
News18
News18
advertisement

समृद्धी महामार्गापेक्षा तब्बल पाचपट अधिक अपघात नागपूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर घडत असल्याची माहिती 'माहिती अधिकारातून उघड झाली आहे. अपघातांच्या वाढत्या संख्येसोबतच या मार्गावरील मृत्यूंचा आकडाही चिंताजनक आहे, जो समृद्धी महामार्गावरील मृत्यूंच्या तुलनेत अनेक पटीने अधिक आहे. राष्ट्रीय महामार्गाचे विदारक चित्रराज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने (NHAI) दिलेल्या गेल्या पाच वर्षांतील अपघातांच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय महामार्गांवरील मृत्यूदर राज्य महामार्गांच्या तुलनेत दुप्पट आहे. नागपूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचा इतिहास तर अधिकच विदारक आहे.

advertisement

या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत केवळ नागपूर-धुळे महामार्गावर ८,९२४ अपघात झाले असून, त्यात २,२४१ नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. समृद्धी'च्या तुलनेत ५ पट अधिक अपघातया राष्ट्रीय महामार्गाची तुलना जर सर्वाधिक चर्चेत असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी केली, तर अपघातांची तीव्रता स्पष्ट होते.

advertisement

या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत केवळ नागपूर-धुळे महामार्गावर ८,९२४ अपघात झाले असून, त्यात २,२४१ नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. जिथे समृद्धी महामार्गावर गेल्या तीन वर्षांत (२०२२-२०२४) एकूण १,०१४ अपघात झाले आहेत आणि १४२ मृत्यू झाले आहेत, तिथे नागपूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर केवळ २०२३ या एकाच वर्षात १,९८४ अपघात आणि ४९७ मृत्यू झाले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

तज्ज्ञांच्या मते, दोन्ही महामार्गांवर वेगामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. समृद्धी महामार्ग रुंद आणि सरळ आहे. अजिबात डिस्ट्रॅक्शन नाहीत त्यामुळे त्याचाही त्रास होऊ शकतो. तर दोन्ही महामार्गांवर वाहतुकीचा वेग प्रचंड वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाण जास्त दिसत आहे. यावरुन समृद्धी महामार्गापेक्षा नागपूर धुळे महामार्ग हा अधिक धोक्याचा आणि अपघाताचा ठरतोय हे ITR मधून स्पष्ट झालं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
समृद्धी महामार्गच नाही तर या रस्त्यावर जातात सगळ्यात जास्त जीव, तुम्हाला माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल