आरोपीला तात्काळ अटक करावी, तसेच शहरात सुरू असलेल्या ड्रग्ज विक्रीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस भरती प्रशिक्षणाच्या अकॅडमी कार्यरत असून काही ठिकाणी प्रशिक्षणार्थींना तथाकथित स्टॅमिना वाढीसाठी अमली पदार्थ दिले जात असल्याचे गंभीर आरोपही यावेळी करण्यात आले.
व्यायामशाळांमधून तरुणांना ड्रग्ज?
अत्याचार प्रकरणानंतर शहरात संतापाचे वातावरण आहे. आंदोलकांनी डीएसपी चौक परिसरात जमून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरात ड्रग्सचा खुलेआम व्यवहार सुरू असल्याचा आरोप करत, डबल सीट दुचाकींवरून नियम मोडत फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. काही व्यायामशाळांमधून तरुणांना व्यसनाधीन केलं जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. यावेळी आधी लव्ह जिहाद, लँड जिहाद ऐकलं, आता ड्रग्सच्या माध्यमातून तरुण पिढी उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सुरू आहे, असा गंभीर इशाराही देण्यात आला.
advertisement
संग्राम जगताप यांचा निर्वाणीचा इशारा
श्रीगोंद्यात झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. आरोपी अजूनही मोकाट फिरतोय, हे पोलिसांचे अपयश आहे. शहरात ड्रग्सचा सुळसुळाट झाला आहे. डीएसपी चौकात नियम मोडत फिरणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. जर पोलिसांनी कठोर पावलं उचलली नाहीत, तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय.
