राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अकोल्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना पवारांनी भाजपवर आणि अजित पवार गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं.
'आमच्यातील काही लोकांचा भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता. आमचा तो प्रस्ताव नव्हताच. पण तो स्वीकारला नाही. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची पुढचा प्रस्ताव मान्य नव्हता. सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचा भुजबळांचा प्रस्ताव होता. भुजबळ यांनी कबूल केले की ते खोटं बोलून गेले आहेत, त्यामुळेच ते शपथविधीला गेले. सर्व आमदार फोडून त्यांनी हे राज्य आपल्या हातात घेतला आहे, असं म्हणत पवारांनी भुजबळांच्या दाव्यातून हवा काढली.
advertisement
अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. याबद्दल शरद पवार यांना पत्रकारांनी विचारले असता, पवार म्हणाले की, अजित पवार हे मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ही न घडणारी गोष्ट आहे. अजितदादांना निवडणुकीमध्ये स्वीकारायचं की नाही हे लोकच ठरवतील, असंही पवार म्हणाले.
भाजप विरोधात जे एकत्र येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत सकारात्मक आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे, असंही पवार म्हणाले.
देशाची जर एकंदरीत यादी बघितली तर 70% राज्यात भाजप नाही. लोकांचा एक समज आहे की भाजप राज्यात नाही पण देशात येण्याची शक्यता आहे पण आता राज्यांची परिस्थिती पाहिली तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काही ना काही परिणाम नक्कीच दिसून येईल, असं भाकितही पवारांनी वर्तवलं.
(सत्ता संघर्षाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; राहुल नार्वेकरांसमोरील पेच वाढला, नेमकं काय घडलं?)
ईव्हीएम मशीन बद्दल संसदेत तक्रारी आहेत, निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी आहेत मात्र उत्तर आलेलं नाही. यूएनचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहिलं तरी हरकत नाही लोक निवडणुकांच्या जागेबद्दल बोलत आहे. आमच्या आघाडीत मोदी विरोध येतील त्यांचं स्वागत आहे, याबद्दल आम्ही तिघे बसून एकत्रित निर्णय घेऊ, असंही पवार म्हणाले.
भाजपची सत्ता नको अशी जनतेची भावना आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपात किती स्थान हे मागील निवडणुकीत दिसलं, असा टोलाही पवारांनी लगावला.