TRENDING:

Ajit Pawar: अपघाताच्या काही मिनिटांआधी अजितदादांचा सुनेत्रा वहिनींच्या नातेवाईकाला फोन, दादांचे शेवटचे शब्द, काय दिला होता निरोप?

Last Updated:

अजित पवार यांच्या विमान अपघातावरून विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माहेरच्या व्यक्तीने महत्त्वाची माहिती पहिल्यांदा प्रसार माध्यमांशी बोलताना दिली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळे अजूनही कार्यकर्ते दुखातून सावरले नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातावरून विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माहेरच्या व्यक्तीने महत्त्वाची माहिती पहिल्यांदा प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. ज्या दिवशी अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता, त्यावेळी त्यांनी फोन केला होता, फोनवर बोलणंही झालं होतं, अशी माहिती अर्चना पाटील यांनी दिली.
News18
News18
advertisement

भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या धाराशिव जिल्ह्यात तेर गटामधून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. अर्चना पाटील या सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईक आहे. मागील दोन दिवसांपासून त्या मुंबईत होत्या. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, या मुद्यावर प्रतिक्रिया देत असताना त्यांनी अपघाताच्या आधी अजितदादांचा फोन आला होता, असं सांगितलं आहे.

advertisement

"सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण हे दु:ख खूप मोठं आहे, काका अजित पवार यांचं निधन झालं. पद्मसिंह पाटील यांच्यानंतर बरोबरीने त्यांनी कुटुंबाला आधार दिला. जरी राणा दादा हे दुसऱ्या पक्षात असले तरी राणा दादांना मानसिक आधार होता. प्रत्यक क्षणाला साथ होती. ८.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पण, त्याआधी अजितदादांनी राणा दादांना फोन केला होता. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं धाराशिवमध्ये येणार होते. त्या कार्यक्रमासाठी त्यांनी फोन केला होता. "मी येऊ शकत नाहीये. पण मी नक्की मंत्री दर्जाच्या माणसाला पाठवतो. अर्चना उभी आहे, तर पाठवतोय' असं आश्वासन अजितदादांनी दिलं होतं, असं अर्चना पाटील यांनी सांगितलं.

advertisement

'सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून चांगल्या निर्णय घेतील'

"पवार कुटुंबाला मोठं दु:ख झालं आहे. सुनेत्रा आत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. निश्चित अभिमान आहे. तेरची मुलगी ही राज्याची उपमुख्यमंत्री झाली आहे. सुनेत्रा आत्यांनी यांनी ग्राऊंड लेव्हलवर काम केलं आहे. काटेवाडी निर्मल गाव योजना त्यांनी राबवली आहे. एक शांतपणे अजितदादांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. लग्न झाल्यापासून मागील ४० वर्षांपासून त्या काम करत आहे. त्या अचानक अशा राजकारणात आल्या असं नाही. महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे की, घर हे पुरुष आणि महिलेच्या नावावर असला पाहिजे. पण हा निर्णय २० वर्षांपूर्वी काटेवाडीत राबवला होता. महिलेला घरातून बाहेर काढू नये, म्हणून सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत हा निर्णय घेतला होता. त्यांचा या निर्णयाची दखल घेऊन तो राज्य शासनाने राज्यातही अंमलात आणला. त्यांना गोरगरिब महिलांची जाण आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहून आधार वाटतोय. सगळ्या महिला आशेनं पाहत आहे" असंही यावेळी अर्चना पाटील म्हणाल्या.

advertisement

"सुनेत्रा पवार यांचे वडील बाजीराव पाटील हे गावचे सरपंच होते. घरात लोक प्रश्न घेऊन यायचे. त्यामुळे त्यांनी घरात लोकांच्या समस्या कशा सोडायचं हे जवळून पाहिलं आहे. त्या जास्त बोलत जरी नसल्या तरी योग्य निर्णय घेण्यास त्या सक्षम आहे" असंही अर्चना पाटील यांनी आवर्जून सांगितलं.

माहेरची माणसं म्हणून आम्ही पाठीशी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सात वाजताच होतात मोबाईल आणि टीव्ही बंद,या गावाचा कौतुकास्पद निर्णय
सर्व पहा

"राणा दादा हे पवार कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. त्यांची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही भक्कम आहे. आम्ही माहेरची माणसं म्हणून सगळे पाठीशी आहोत. या दुखाच्या प्रसंगी मानसिक आधार देण्याची गरज आहे. त्यांना आणि मुलांना योग्य तो आधार देण्याची आज वेळ आहे. त्यांच्या पाठीशी ठामपणे राहणार आहे" असंही अर्चना पाटील म्हणाल्या.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar: अपघाताच्या काही मिनिटांआधी अजितदादांचा सुनेत्रा वहिनींच्या नातेवाईकाला फोन, दादांचे शेवटचे शब्द, काय दिला होता निरोप?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल