TRENDING:

'हे हास्य पुन्हा कधीच दिसणार नाय', रोहित पवारांकडून अजितदादांचा UNSEEN VIDEO पोस्ट

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash News: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. आता रोहित पवारांनी अजित पवारांचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
Ajit Pawar Plane Crash News: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात अजित पवारांसह इतर पाच जणांचा देखील करून अंत झाला. आता या अपघाताबाबत विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यांचा अपघात हा अपघात नसून घातपात असल्याचा संशयही अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने यावर प्रतिक्रिया देत आहेत. विविध प्रश्न उपस्थित करत आहेत.
News18
News18
advertisement

रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवारांच्या अपघाताबाबत आता ते आज बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करणार आहेत. त्यांनी बुधवारी मुंबईतील मरीन लाईन पोलीस ठाण्यातही याबाबत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अजितदादांच्या अपघाताचं हे प्रकरण आता चांगलंच तापताना दिसत आहे. शिवाय अपघाताच्या दुसऱ्या दिवशी बारामती पोलीस ठाण्यात ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांकडून ब्लॅक बॉक्सबद्दल माहिती लपवली जात आहे का? असा सवाल उपस्थित होतं आहे.

advertisement

अजित पवारांच्या अपघाताबाबत गूढ वाढत जात असताना आता रोहित पवारांनी अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये हा व्हिडीओ शेअर केला आहे. "अजितदादांचं हे मनमोकळं खळखळून हास्य पुन्हा कधीच दिसणार नाही, या विचाराने आमच्यासारख्या लाखो जणांना आजही अश्रू आवरता येत नाहीत. म्हणूनच या अश्रूंची किंमत वसूल केल्याशिवाय महाराष्ट्र थांबणार नाही...!" असं कॅप्शन रोहित पवारांनी या व्हिडीओला दिलं आहे. रोहित पवारांनी शेअर केलेल्या या जुन्या व्हिडीओत अजित पवार खळखळून निरागसपणे हसताना दिसत आहेत.

advertisement

अजित पवारांचा अपघात कसा झाला?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रमजानमध्ये दिली जाते जकात, काय आहे या मागील प्रथा आणि महत्त्व? Video
सर्व पहा

२८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला. त्यादिवशी अजित पवार मुंबईहून बारामतीच्या दिशेनं येत होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. याच सभांना संबोधित करण्यासाठी ते विमानाने बारामतीच्या दिशेनं आले. मात्र सकाळी धुक्यांमुळे दृश्यमानता कमी असल्याने त्यांच्या विमानाला लँडिंग करता आलं नाही. त्यामुळे विमानाने पहिल्यांदा 'गो अराऊंड' घेतला. यानंतर साधारण तीन मिनिटांनी पुन्हा लँडींगचा दुसरा प्रयत्न करण्यात आला. पण हा प्रयत्न फसला आणि विमान धावपट्टीजवळ कोसळलं. यात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'हे हास्य पुन्हा कधीच दिसणार नाय', रोहित पवारांकडून अजितदादांचा UNSEEN VIDEO पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल