उपमुख्यमंत्री अजित पवार हे धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. अजित पवार हे परंडा तालुक्यातील देवगाव येथे रात्री उशिरा पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांना संवाद साधताना हा प्रकार घडला आहे. यावेळी पाहणी करताना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तरुणांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांचा तोल सुटला. 'जो काम करतो त्याचीच मारता का असं म्हणत याला मुख्यमंत्री करा प्रश्न विचारणालाच अजितदादांनी झापलं.
advertisement
नेमकं काय म्हणाले अजितदादा?
अजित पवार प्रसारमाध्यमांसमोर शेतकऱ्यांशी संवाद साधत होते, 'ठीक आहे ना, कधी स्वप्नात वाटलं नव्हतं इतकं पाणी आलं आहे. आपल्या परिसरातलं पाणी उतारावरून खाली आलं, पण तुम्ही धीर सोडू नका, आम्ही सगळे सोबत आहोत. तितक्या एका जणाने कर्जमाफीबद्दल विचारलं. हे ऐकून अजितदादा म्हणाले की, 'याला द्यारे मुख्यमंत्रिपद, तुला कळतंय का, आम्ही इथं काय गोट्या खेळायला आलो का, सकाळी ६ वाजता सुरू केलं बाळा मी. अजून एका ठिकाणी जायचं आहे. जे काम करतं ना, त्याचीच मारा, बघा ना आता, एवढं जीव तोडून सांगतोय, अजून पण एका ठिकाणी जायचं आहे. आम्हालाही कळतंय ना. लाडक्या बहिणींना इतकं काही दिलं आहे. ४५ हजार कोटी रुपये वर्षाला मदत करतोय. शेतकऱ्यांची वीज माफी केली आहे. २० हजार कोटी भरतोय' असं म्हणत अजितदादांनी सगळ्यांसमोर त्या तरुणाला झापलं.
तसंच, 'सगळी सोंग करता येतात पैशाची सोंग करता येत नाहीत, असं सांगत कर्जमाफीच्या विषयाला देखील ब्रेक लावला. दरम्यान. मंत्र्यांना पूरग्रस्तांचा रोशाला सामोरे जावं लागत होतं आता मात्र अजितदादांनी हे वक्तव्य करून नवा वाद ओढावून घेतला आहे.