Hingoli Crime : हिंगोलीत रक्तरंजित थरार! रात्री 11 वाजता घराची कवाडं वाजली अन् बंदुकीतून सुटल्या गोळ्या; बाप-लेकाचा मृत्यू

Last Updated:

Hingoli Double Murder Case : मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कुंडलिक जगताप हे त्यांचा मुलगा शिवराज जगताप, तसेच सुभाष कुरवाडे आणि बालाजी जगताप यांच्यासोबत बाबाराव जगताप यांच्या घरी गेले.

Hingoli Double Murder Case
Hingoli Double Murder Case
Hingoli Crime news : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशातच हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव गावात जुन्या शेतजमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतले आहे.

शेतीवरून अनेक वर्षांपासून वाद

भांडेगाव येथील रहिवासी कुंडलिक जगताप आणि बाबाराव जगताप यांच्यात शेतीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. या वादामुळे त्यांच्यामध्ये सतत कुरबुरी होत होत्या. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कुंडलिक जगताप हे त्यांचा मुलगा शिवराज जगताप (वय 29), तसेच सुभाष कुरवाडे आणि बालाजी जगताप यांच्यासोबत बाबाराव जगताप यांच्या घरी गेले.
advertisement

कुंडलिक यांना तीन गोळ्या लागल्या

कुंडलिक यांनी दरवाजा वाजवताच, बाबारावने दरवाजा उघडून त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. या गोळीबारात कुंडलिक यांना तीन गोळ्या लागल्या, तर त्यांचा मुलगा शिवराज जगताप यांच्या छातीत गोळी लागली. या दोन्ही बापा-लेकांचा जागेवरच मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेले सुभाष कुरवाडे आणि बालाजी जगताप हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement

पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि तात्काळ तपास सुरू केला. रात्रीच पोलिसांनी भांडेगाव गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता, ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गोळीबारामध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी बाबाराव जगताप, विठ्ठल जगताप आणि ज्ञानेश्वर जगताप या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Hingoli Crime : हिंगोलीत रक्तरंजित थरार! रात्री 11 वाजता घराची कवाडं वाजली अन् बंदुकीतून सुटल्या गोळ्या; बाप-लेकाचा मृत्यू
Next Article
advertisement
BJP Eknath Shinde : मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुतीची घोषणा
मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र
  • मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र

  • मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र

  • मोठी बातमी! भाजप-शिंदे गटातील वाद शमला, महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र

View All
advertisement