Karnavati Express : मुंबई सेंट्रलला जाऊ नका; कर्णावती एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल, इथं चेक करा
Last Updated:
Karnavati Express Update News : पश्चिम रेल्वेने कर्णावती एक्स्प्रेसचा टर्मिनस तात्पुरता बदलला आहे. जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक.
मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि कामकाजाशी संबंधित कारणांमुळे कर्णावती एक्स्प्रेसच्या सुरुवात-शेवटच्या स्थानकात तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
किती दिवसांसाठी असणार आहे हा बदल?
मुंबई सेंट्रल ते वटवा (अहमदाबाद) आणि परतीच्या प्रवासासाठी धावणारी 12933/12934 कर्णावती एक्स्प्रेस आता मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनसवरून धावणार आहे. हा बदल 26 जानेवारीपासून 7 मार्च 2026 या कालावधीसाठी लागू राहणार आहे.
या स्थानकावरुन सुटणार ट्रेन
या कालावधीत कर्णावती एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल स्थानकावरून न सुटता थेट वांद्रे टर्मिनसवरून रवाना होईल. त्यानुसार 12933 क्रमांकाची कर्णावती एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनस येथून दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी रवाना होणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात 12934 क्रमांकाची कर्णावती एक्स्प्रेस दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी वांद्रे टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
advertisement
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन केले असून प्रवासाचे नियोजन करताना सुधारित वेळापत्रक तपासण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतहा मुंबई सेंट्रल स्थानकावरून प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांनी या बदलाची माहिती आधीच घेणे आवश्यक आहे. तात्पुरत्या स्वरूपाचा हा बदल असल्याने 7 मार्चनंतर कर्णावती एक्स्प्रेस पुन्हा मुंबई सेंट्रलवरून धावेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 11:54 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Karnavati Express : मुंबई सेंट्रलला जाऊ नका; कर्णावती एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल, इथं चेक करा








