Real Vs Fake Silver : तुम्ही नकली चांदीचे दागिने तर घालत नाही? या 5 पद्धतींनी घरीच पारखता येते चांदीची शुद्धता..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Real VS Fake Silver Jewelry : सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा आणि घालण्याचा छंद अनेकांना असतो. चांदीबाबत सांगायचे तर महिला ती दैनंदिन वापरातही घालणे पसंत करतात. सध्या सोने-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत, अशा परिस्थितीत चांदी खरेदी करताना ती खरी आहे की बनावट, याची नीट तपासणी करूनच दागिने घ्यावेत.
आता चांदीही सोन्यासारखीच महाग झाली आहे. लोक चांदी खरेदीसाठी रांगा लावत आहेत. आधी सोनं घ्यायला भीती वाटायची. आता चांदीमागे लोक धाव घेत आहेत. जेव्हा एक किलो चांदीची किंमत फक्त एक लाख रुपये होती, तेव्हा कुणी फारसे लक्ष दिले नव्हते. पण आता किंमत तीन लाखांच्या पुढे गेली असून चार लाखांकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे लोक खरेदीसाठी धाव घेत आहेत. अनेक जण तर पैसे उधार घेऊनही चांदीत गुंतवणूक करत आहेत. कारण मार्केट एक्सपर्ट्स सांगत आहेत की, चांदीची किंमत दुप्पट होऊ शकते. याच अपेक्षेने लोक तीन लाख रुपये देऊन एक किलो चांदी खरेदी करत आहेत आणि काही महिन्यांत तिची किंमत सहा लाख होईल अशी आशा ठेवत आहेत.
advertisement
सध्या चांदीची किंमत किलोमागे सुमारे 3,60,000 रुपये आहे. मात्र काही लोक याच संधीचा फायदा घेत बनावट चांदी विकत आहेत. खरेदीदारांना ती खरी आहे की नकली, हे कळत नाही आणि त्यामुळे ते सहज फसवले जातात. अनेक ठिकाणी बनावट चांदीचा हा धंदा उघडकीसही आला आहे. म्हणूनच आपण खरेदी करत असलेली चांदी खरी आहे की बनावट, हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
हॉलमार्क : चांदी खरेदी करताना सर्वात आधी हॉलमार्क नक्की तपासा. त्यावर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चे लोगो, 925 ग्रेड (92.5% शुद्ध चांदी) ची माहिती आणि ज्वेलरची ओळख दर्शवणारे चिन्ह आहे की नाही, हे पाहा. ही सर्व चिन्हे असतील तर तुमची चांदी बनावट नाही. हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांमध्ये बनावट असण्याची शक्यता जास्त असते. नव्या नियमांनुसार चांदीसाठी सात शुद्धतेचे ग्रेड असतात. ते म्हणजे 800, 835, 925, 958, 970, 990, 999. हॉलमार्कमध्ये ‘SILVER’ असे लिहिलेले असते, BIS चे चिन्ह, शुद्धतेचा ग्रेड आणि HUID कोडही असतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








