Online sale Scam : सेलमध्ये घेताय AC-Fridge? मग 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाही तर ऑफर पडेल महागात

Last Updated:

फक्त सवलतीच्या किमतीवरून एसी किंवा फ्रिज खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडा थांबा. कारण एसी आणि फ्रिजसारख्या उत्पादनांचा उपयोग किमान 5 ते 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ करावा लागतो. त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार न केल्यास, स्वस्त ऑफरमध्ये घेतलेले उत्पादन तुमच्यासाठी महाग ठरू शकतात.

Ai generated photo
Ai generated photo
मुंबई : फेस्टिव्ह सीझनमध्ये अनेक लोक सेलमध्ये स्वस्त एसी, फ्रिज सारखे इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करतात. यावेळी 22 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या GST नवीन दरांमुळे आणि Flipkart, Amazon सारख्या ई-कॉमर्स सेलमुळे खरेदीदारांना दुप्पट फायदा होणार आहे. मात्र, फक्त सवलतीच्या किमतीवरून एसी किंवा फ्रिज खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडा थांबा. कारण एसी आणि फ्रिजसारख्या उत्पादनांचा उपयोग किमान 5 ते 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ करावा लागतो. त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार न केल्यास, स्वस्त ऑफरमध्ये घेतलेले उत्पादन तुमच्यासाठी महाग ठरू शकतात.
1. नवीन ब्रँड्सवर विचारपूर्वक विश्वास ठेवा
Flipkart किंवा Amazon सेलमध्ये नवीन ब्रँड्सच्या एसी आणि फ्रिजवर जास्त सवलत मिळते. मात्र नवीन ब्रँडच्या उत्पादनांमध्ये समस्या येऊ शकतात. अनेक वेळा हे ब्रँड काही वर्षांतच बंद होतात आणि खराब झाल्यावर स्पेअर पार्ट्स उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे, विश्वासार्ह ब्रँडचा फ्रिज किंवा एसी थोड्या कमी सवलतीत घेतला तर देखील दीर्घकालीन फायदा होऊ शकतो.
advertisement
2. वॉरंटी तपासा
इन्व्हर्टर टेक्नोलॉजीवर चालणारे AC किंवा फ्रिज घेताना वारंटीवर विशेष लक्ष द्या. इन्व्हर्टरमध्ये PCB (सर्किट बोर्ड) वेगळा असतो आणि तो खराब झाला तर खर्च उत्पादनाच्या किमतीइतका किंवा त्याहून जास्त होऊ शकतो अशावेळी सगळे पैसे पाण्याती जातील. त्या तुलनेत चांगले ब्रँड्स इन्व्हर्टर टेक्नोलॉजीवर 5 वर्षांची PCB वारंटी देतात, त्यामुळे त्यामध्ये इन्वेस्ट करा.
advertisement
3. एक्स्टेंडेड वारंटी ब्रँडकडून घ्या
ई-कॉमर्सवर काही वेळा एक्स्टेंडेड वारंटी ऑफर दिली जाते, पण ती खरेदी करताना काळजी घ्या. उत्पादन घेतलेला ब्रँडकडून एक्स्टेंडेड वारंटी घेणे सोयीस्कर ठरते कारण तिचा क्लेम करणे सहज होते. ई-कॉमर्सकडून घेतलेली वारंटी क्लेम करताना अटींमध्ये प्रॉबलम असतात आणि शेवटी त्याचा फायदा मिळत नाही.
4. उत्पादनाची गुणवत्ता पाहा
फक्त सवलतीच्या किमतीवर लक्ष ठेवू नका. एसी किंवा फ्रिजची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि ऊर्जा बचत क्षमता तपासणे महत्त्वाचे आहे. दीर्घकालीन वापरासाठी फक्त कमी किंमत बघून निर्णय घेणे चुकीचे ठरते.
advertisement
5. सेल ऑफरच्या अटी वाचा
सेलमध्ये उपलब्ध ऑफर आणि कूपनच्या अटी काळजीपूर्वक वाचा. काही वेळा डिस्काउंट फक्त ऑनलाइन पेमेंट किंवा बँक ऑफरवर लागू होतो. तसेच, रिटर्न पॉलिसी, डिलिव्हरी शुल्क आणि इंस्टॉलेशन खर्च लक्षात घ्या.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Online sale Scam : सेलमध्ये घेताय AC-Fridge? मग 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाही तर ऑफर पडेल महागात
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement