'माझी होणारी सून', जया बच्चननी करून दिलेली ओळख, अशी होती करिश्मा कपूरची रिअ‍ॅक्शन, VIDEO व्हायरल

Last Updated:

करिश्मा कपूर 'आमची होणारी सून' आहे असं जया बच्चन यांनी सगळ्यांना मोठ्यानं सांगितलं होतं. जया यांनी होणाऱ्या सूनेची घोषणा केल्यानंतर करिश्माची रिअ‍ॅक्शन पुन्हा एकदा व्हायरल होतोय.

News18
News18
अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची सून म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्या ही कधीच बच्चन कुटुंबाची सून म्हणून पहिली पसंत नव्हती. अभिषेक आणि करिश्मा कपूर यांचं लग्न होणार होतं. दोघांचा साखरपुडाही झाला होता. पण गोष्ट लग्नापर्यंत जाण्याआधीच बिनसली. करिश्मा कपूर 'आमची होणारी सून' आहे असं जया बच्चन यांनी सगळ्यांना मोठ्यानं सांगितलं होतं. जया यांनी होणाऱ्या सूनेची घोषणा केल्यानंतर करिश्माची रिअ‍ॅक्शन पुन्हा एकदा व्हायरल होतोय. एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होतोय.
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न ठरलं होतं. दोघांचा साखपुडा झाला होता. कपूर आणि बच्चन कुटुंबीय यानिमित्तानं पुन्हा एकत्र येणार होते. करिश्मा कपूरच्या आत्याच्या मुलाशी अभिषेक बच्चनच्या बहिणीचं म्हणजेच श्वेता बच्चनचं लग्न झालं होतं. त्यामुळे कपूर आणि बच्चन हे एकमेकांचे व्याही होते. करिश्मा आणि अभिषेक यांच्या लग्नामुळे ते नातं आणखी जवळ येणार होतं.
advertisement
अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या साठाव्या बर्थ डे निमित्तानं आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात बच्चन कुटुंबानं आपल्या होणाऱ्या सुनेचं सर्वांसमोर स्वागत केलं होतं. जया बच्चन यांनी म्हटलं होतं,बच्चन आणि नंदा कुटुंबीय आता कपूर खानदानाला देखील आमच्या ग्रुपचा हिस्सा करणार आहोत. बबीता आणि रणधीर कपूर यांच्याबरोबर आम्ही आमची होणारी सून करिश्मा कपूरचं स्वागत करतो.
advertisement
जया बच्चन यांनी करिश्माला होणारी सून म्हटल्यानंतर करिश्मा उठून स्टेजवर आली होती. तिने जया यांना मिठी मारली. जया यांचं करिश्मवर खूप प्रेम होतं. नंतर जया बच्चन म्हणाल्या, अभिषेकनं त्याच्या आई-वडिलांना त्यांच्या साठाव्या बर्थडेचं हे गिफ्ट दिलं आहे. हे ऐकून करिश्मा खूप लाजली होती. जया देखील करिश्माकडे प्रेमात पाहत हसल्या. बच्चन कुटुंबाची होणारी सून म्हणून सगळेच करिश्माकडे कौतुकानं पाहत होते. करिश्मा देखील सगळ्यांशी प्रेमानं हाय हॅलो करताना दिसली.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Anjana Kumawat (@celebsshorts9)



advertisement
पण करिश्माचा हा आनंद काही काळच टिकला. दोघांचा साखरपुडा झाला आणि काही दिवसांत त्यांचं नातं तुटलं. त्यानंतर कपूर आणि बच्चन कुटुंबानं यावर कधीच कुठेच वक्तव्य केलं नाही. असं म्हणतात की, करिश्मा आई बबिता हिला हे लग्न मान्य नव्हतं. दोघांचं लग्न ठरलं तेव्हा अभिषेक स्ट्रगलर होता. फ्लॉप करिअर सुरू असलेल्या हिरोशी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. याकारणामुळेच अभिषेक आणि करिश्मा यांचं लग्न मोडल्याचं म्हटलं जातं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझी होणारी सून', जया बच्चननी करून दिलेली ओळख, अशी होती करिश्मा कपूरची रिअ‍ॅक्शन, VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
Eknath Shinde Ravindra Chavan: शिंदेंच्या निवासस्थानी ५ तास मॅरेथॉन बैठक, रविंद्र चव्हाणांसोबतच्या बैठकीत महायुतीचं काय ठरलं?
शिंदेंच्या निवासस्थानी ५ तास मॅरेथॉन बैठक, रविंद्र चव्हाणांसोबतच्या बैठकीत महायु
  • शिंदेंच्या निवासस्थानी ५ तास मॅरेथॉन बैठक, रविंद्र चव्हाणांसोबतच्या बैठकीत महायु

  • शिंदेंच्या निवासस्थानी ५ तास मॅरेथॉन बैठक, रविंद्र चव्हाणांसोबतच्या बैठकीत महायु

  • शिंदेंच्या निवासस्थानी ५ तास मॅरेथॉन बैठक, रविंद्र चव्हाणांसोबतच्या बैठकीत महायु

View All
advertisement