13 वर्षांचा संसार, पदरात 2 मुलं, करोडोंची संपत्ती; सगळं काही आलबेल तरी का झाला करिष्मा-संजयचा डिवोर्स
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Karisma Kapoor - Sanjay Kapoor Divorce Reason : करिष्मा कपूर आणि संजय कपूर यांनी तब्बल 13 वर्षांचा संसार केला. पदरात दोन मुलं असताना त्यांनी डिवोर्स घेतला. त्यांच्या डिवोर्सचं कारण काय होतं?
बॉलिवूडची लोलो म्हणजेच अभिनेत्री करिष्मा कपूर सध्या चर्चेत आहे. करिष्मा कपूरचा एक्स नवरा बिझनेसमन संजय कपूरचं काही दिवसांआधी अचानक मृत्यू झाला.

संजय कपूरच्या मृत्यूनंतर त्याच्या करोडोंच्या संपत्तीचा वाद उफाळून आला आहे. करिष्माच्या मुलांनीही संजयच्या संपत्तीवर आपला हक्क दाखवला आहे.

करिष्मा आणि संजय यांनी तब्बल 13 वर्षांचा संसार केला. दोघांना दोन मुलं आहेत. करिष्माचं हे लग्न तिच्या आई-वडिलांनी जमवून दिलं होतं. संजय कपूरच्या घरी सगळं काही आलबेल होतं.
advertisement

करिष्मा ही संजयची दुसरी बायको होती. दोघेही आपल्या मुलांबरोबर श्रीमंतीत राहत होते. पण असं काय झालं ज्यामुळे करिष्मा आणि संजय यांचा डिवोर्स झाला.
advertisement

संजय कपूरबरोबर लग्न होण्याआधी करिष्माचा साखरपुडा अभिनेता अभिषेक बच्चनसोबत झाला होता. पण काही कारणांमुळे दोघांचा साखरपुडा मोडला. साखरपुडा मोडल्यानंतर करिष्माने 29 सप्टेंबर 2003 साली दिल्लीतील उद्योगपती आणि घटस्फोटित असलेल्या संजय कपूरशी लग्न केलं. हे लग्न त्या काळात प्रचंड गाजलं होतं. करिश्माची आई बबिता यांनी त्यावेळी संजयला एक चांगला माणूस असल्याचं सांगितलं होतं.
advertisement

लग्नानंतर करिश्मा कपूर तिचे प्रोजेक्ट्स पूर्ण करून दिल्लीला शिफ्ट झाली. ती 'करिश्मा: अ मिरॅकल ऑफ डेस्टिनी' या शोचं शूटिंग करत होती. मात्र संजयला तिचं मुंबईला जाणं आवडत नसल्याच्या बातम्या तेव्हा समोर आल्या. करिष्माने तो शो सोडला आणि त्यानंतर मात्र ती बॉलिवूडपासून हळूहळू दूर गेली.
advertisement

करिष्मा संसारात रमली. मार्च 2005 मध्ये करिश्माने मुलगी समायराला जन्म दिला. काही काळानंतर संजयने तिला डिवोर्स पेपर्स दिले होते पण तिने सही करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांच्या नात्यात सुधारणा झाली होती. 2011 मध्ये करिष्माने मुलगा कियानला जन्म दिला. दोघांना दोन मुलं झाली पण 2016 साली दोघांच्या डिवोर्सची बातमी समोर आली.
advertisement

करिश्माने संजयवर घरगुती हिंसाचार आणि ड्रग्जच्या गैरवापराचे आरोप केले होते. तर संजयच्या कुटुंबाने करिष्माची आई बबितावर हस्तक्षेपाचा आरोप केला होता. अखेर दीर्घ कोर्ट खटल्यानंतर 2016 मध्ये करिश्मा आणि संजयचा डिवोर्स झाला.
advertisement

करिष्मासोबत डिवोर्सनंतर 2017 मध्ये संजय कपूरने प्रिया सचदेवशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगा झाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 2:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
13 वर्षांचा संसार, पदरात 2 मुलं, करोडोंची संपत्ती; सगळं काही आलबेल तरी का झाला करिष्मा-संजयचा डिवोर्स