TRENDING:

Ajit Pawar: हाच 'तो' व्हायरल झालेला अजितदादांचा शेवटचा फोटो, कुणी केला क्लिक? शहारे आणणारा अनुभव

Last Updated:

आदरणीय दादा आपण अकलूज येथील भर सभेत वर्ष २०१८ मध्ये हे वाक्य बोलले होते. आठ वर्षांपूर्वी… एक साधा कॅमेरा आणि अंगात केवळ कामाची निष्ठा

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'कामाचा माणूस' म्हणून ओळखले जाणारे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीच्या पक्षावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. इतक्या उमद्या मनाचा नेता आपल्याला असं सोडून जाईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. अजितदादांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. यावेळी श्रद्धांजली कार्यक्रमात, सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या आणि दैनिकांमध्ये अजित पवार यांचा सॅल्युट करणारा फोटो वापरला जात आहे. हाच फोटो अजितदादांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रमातला होता. हा फोटो काढला होता, त्यांच्या खासगी फोटोग्राफरने. त्याची पोस्ट आता व्हायरल झाली आहे.
News18
News18
advertisement

अजित पवार जिथे असतील तिथे सचिव, सुरक्षारक्षक आणि  फोटोग्राफर सदैव सोबत असायचे. त्यामुळे सावलीसारखे सोबत असणारे हे साथीदार अजितदादांच्या जाण्यामुळे भावुक झाले. खासगी फोटोग्राफर नीरज तांडेल यांनी अजितदादांबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. अजित तांडेल हे २०१८ पासून फोटोग्राफर म्हणून काम पाहत होते. अजितदादांच्या निधनानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी फोटोग्राफर म्हणून काम पाहणार आहे.

advertisement

अलीकडे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये नीरज यांनी अजितदादांचा पोलिसांची मानवंदना स्वीकारत असताना सॅल्युट केला होता, हाच क्षण नीरज यांनी कॅमेऱ्यात कैद केला. अजितदादांचा हा शेवटाचा सार्वजनिक कार्यक्रम होता. त्यानंतर दोन दिवसांनी अजितदादांचं विमान अपघातात निधन झालं.  इतकी वर्ष  अजितदादांसोबत काम करणारे नीरज तांडेल यांनी आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

advertisement

"हा माझा फोटोग्राफर आहे!

आदरणीय दादा आपण अकलूज येथील भर सभेत वर्ष २०१८ मध्ये हे वाक्य बोलले होते. आठ वर्षांपूर्वी… एक साधा कॅमेरा आणि अंगात केवळ कामाची निष्ठा घेऊन मी अजितदादांच्या कार्यालयात पाऊल ठेवलं आज मागे वळून पाहताना वाटतं – हा प्रवास केवळ एक नोकरीचा नव्हता, तर एक शिक्षणाचा, अनुभवांचा आणि प्रेरणादायी प्रवास होता.

advertisement

माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार – हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात कर्तृत्व, स्पष्टता आणि शिस्त यांचं प्रतीक आहे. अशा नेत्यासोबत आठ वर्षं काम करण्याची संधी मिळणं, हेच माझं भाग्य आहे. या आठ वर्षांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत आलो. जिथे जाईन तिथे दादांचे कार्यकर्ते – त्यांच्यातली ऊर्जा, निष्ठा आणि आपुलकी अनुभवली. दादांचं नेतृत्व म्हणजे फक्त भाषणं नाहीत, तर कृतीतून दिलेला विश्वास!

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

दादा मंचावर उभे असले, की माझा कॅमेरा आपोआप सजग होत होता. कारण तो केवळ एक फ्रेम टिपत नाही, तर इतिहास टिपत होता.! माझ्या आयुष्यातील या आठ वर्षांचा प्रत्येक क्षण मला शिकवत राहिला, वेळेची किंमत, शिस्तीचं महत्त्व आणि माणसांशी नातं जोडण्याची कला… हे सगळं दादांकडूनच शिकलो. "मी अजितदादांकडे काम करतो"  ही ओळ माझ्यासाठी एक वाक्य नाही, तर अभिमानाने मिरवावं असं आयुष्याचं पदक होतं!

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar: हाच 'तो' व्हायरल झालेला अजितदादांचा शेवटचा फोटो, कुणी केला क्लिक? शहारे आणणारा अनुभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल