TRENDING:

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल मोदी सरकारकडून नवी अपडेट, महत्वाची माहिती मिळणार

Last Updated:

या घटनेचा तपास एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडे देण्यात आला आहे. या प्रकरणी एकीकडे आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहे. अशातच 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातात निधनामुळे संशय व्यक्त केला जात आहे. आधी राष्ट्रवादीतून घातपाताचा संशय वक्त केला गेला. त्यानंतर आता पवारांच्या कुटुंबातून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आल्यामुळे संशयाचा धूर आणखी दाटला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी अनेक तथ्य समोर मांडले होते. आता केंद्र सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशीआधीच सुरू झाली आहे, आता लवकरच या घटनेबद्दल सविस्तर माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

२८ जानेवारी रोजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीला विमानाने येत होते. सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास अजितदादांचं विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ घसरलं. या अपघातात अजितदादांसह ५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडे देण्यात आला आहे. या प्रकरणी एकीकडे आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहे. अशातच  नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी महत्त्वाची माहिती दिली. "अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास हा वेगाने आणि योग्य पद्धतीने सुरू आहे. लवकरच या घटनेबद्दल प्राथमिक अहवाल जाहीर केला जाणार आहे" अशी माहिती नायडू यांनी दिली. AAIB कडून फ्लाइट डेटा, विमानाच्या देखभाल नोंदी, ऑपरेशनल पद्धती आणि निर्णयप्रक्रिया या सगळ्या बाबींचा तपास सुरू आहे.

advertisement

त्यामुळे अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपासाचा प्राथमिक अहवाल समोर येणार आहे. या अहवालामध्ये अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं, विमानात बिघाड होता का, राष्ट्रवादीच्याा आमदारांनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का, याचे उत्तर आता या अहवालातून मिळणार आहे.

ब्लॅक बॉक्समधून माहिती गोळा करण्याचं काम सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, आले अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

दरम्यान, अजितदादांच्या विमानातला ब्लॅक बॉक्स हा अपघाताच्या दिवशीच ताब्यात घेण्यात आला होताा. "ब्लॅक बॉक्स" हा तपास यंत्रणा AAIB अर्थात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या ताब्यात आहे.  अपघाताच्या ८ दिवसांनंतर  "ब्लॅक बॉक्स" मधील महत्त्वाची माहिती रिक्व्हर करायला सुरुवात झाली आहे. ब्लॅक बॉक्समधला "डेटा रिकव्हरी" केल्यानंतर नागरी विमान महासंचनालय कडून अहवाल जारी केला जाणार आहे. या अहवालातून त्या दिवशी विमानात काय घडलं होतं, याची संपूर्ण माहिती समोर येणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल मोदी सरकारकडून नवी अपडेट, महत्वाची माहिती मिळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल