मिळालेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव आणि पक्षाचे प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांचा 26 वर्षीय लेक यशवर आज जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात यशच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती.तसेच त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या घटनेने जिल्ह्यात आधीच खळबळ उडाली होती. त्यात या घटननंतर पातोडे यांच्या समर्थकांनी मारेकऱ्याच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली होती, त्यासोबत चारचाकी गाडी जाळल्याचा आरोप हल्ला करणाऱ्या सूरज इंगोले याने केला होता. त्यामुळे या घटनेनं सध्या या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस पथक घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दाखल झाले आहे.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात हल्ला करणाऱ्या सुरज इंगोले यांनी राजेंद्र पातोडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यां विरोधात खदान पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर राजेंद्र पातोडे यांनी सुद्धा खदान पोलिसात सुरज इंगोले विरुद्ध तक्रार देण्यासाठी दाखल केली आहे. या घटनेवर भाष्य करण्यास पोलीस टाळाटाळ करतायत.
सराफाला ब्लॅकमेल करत 18 लाख लुटले
अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेनं आणि तिच्या पतीने संगनमत करून एका व्यापाऱ्याला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकवलं आहे. दोघांनी मिळून सराफाला ब्लॅकमेल करत तब्बल १८ लाख ७४ हजार लुटले. एवढे पैसे लुटूनही आरोपींचं मन भरलं नाही, त्यांनी पुन्हा व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. अखेर आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी मूर्तीजापूर पोलीस ठाण्यात आरोपी पती पत्नीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी जोडप्याला पीडित व्यापाऱ्याकडून पाच लाखांची रक्कम स्विकारताना रंगेहाथ अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.