TRENDING:

Maharashtra politics : 'महायुती विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार की नाही याबाबत शंका'; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य

Last Updated:

विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
अकोला, कुंदन जाधव, प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला, तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीनं राज्यात जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निकालानंतर राज्यातील महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
News18
News18
advertisement

अमोल मिटकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी पुस्तक तुलाचं  आयोजन केलं होतं. ही पुस्तकं बाळापूर तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अमोल मिटकरी यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्यांमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी? 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रमजानमध्ये दिली जाते जकात, काय आहे या मागील प्रथा आणि महत्त्व? Video
सर्व पहा

'सध्या येणारी विधानसभा महायुती एकत्रितपणे लढणार की नाही याबाबत शंका असल्याचं' खळबळजनक वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की 'राष्ट्रवादीला विधानसभेत सन्माजनक जागा मिळाव्यात, 55 जागांचा आकडा कमी आहे. 80 ते 100 जागांची मागणी आहे. विदर्भात अकोला आणि वाशिम मिळून  7 ते 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्यात' अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अकोला/
Maharashtra politics : 'महायुती विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार की नाही याबाबत शंका'; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल