नेमकं काय घडलं?
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या विश्रामगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार, असं सुरक्षा यंत्रणेला वाटलं होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे वाहन थेट मुख्य महामार्गावर लागल्याने त्यांच्या ताफ्यातील मागील सुरक्षा यंत्रणेचा ताफा हा मागेच राहिला. यात पोलिसांचे वाहन आणि ॲम्बुलन्स इतर वाहने मागेच राहिले होते. याआधीही देवेंद्र फडणीस यांच्या ताफ्यामध्ये अकोल्यात चूक झाली होती. आता पुन्हा अकोल्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरक्षा पुरवणाऱ्या यंत्रणेची चूक समोर आली आहे. त्यांनतर काही काळ पोलिसांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. दरम्यान भाजपचा जिल्हास्तरीय मेळावा आटोपल्यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनी विमानतळ मार्ग नागपूरकर प्रस्थान झालेत.
advertisement
Location :
Akola,Maharashtra
First Published :
August 11, 2024 4:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अकोला/
Devendra Fadnavis : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात चूक; अकोल्यातील घटनेने खळबळ