TRENDING:

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा तणाव, बकऱ्यांवरुन तुफान राडा; दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड

Last Updated:

अंभई गावात बकऱ्यांच्या व्यवहारातून सुरू झालेल्या वादातून शिवसेना भाजप गटांत दगडफेक जाळपोळ झाली ५ ते ६ जण जखमी १५ संशयित ताब्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
अनिल साबळे, प्रतिनिधी जि. छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात काल रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचं पर्यावसान दगडफेक आणि जाळपोळीत झाल्याने गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. या हिंसक प्रकारात ५ ते ६ जण जखमी झाले असून, संतप्त जमावाने सुमारे १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. विशेष म्हणजे, या वादाला आता राजकीय रंग चढला असून शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्येही आमनेसामने संघर्ष पाहायला मिळत आहे.
News18
News18
advertisement

वाद नेमका कशामुळे पेटला?

मिळालेल्या माहितीनुसार, वादाची सुरुवात बकऱ्यांच्या व्यवहारातून झाली. मात्र, किरकोळ स्वरूपाचा असलेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला आणि दोन गट एकमेकांसमोर आले. बघता बघता ५०० ते ६०० जणांचा जमाव गोळा झाला. घोषणाबाजी करत दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक सुरू केली. या गोंधळात रस्त्यावरील गाड्यांना टार्गेट करण्यात आलं.

advertisement

दोघे गंभीर जखमी; संभाजीनगरला हलवलं

या भीषण दगडफेकीत ५ ते ६ जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

राजकीय वळण आणि रात्रभर पोलिसांचा पहारा

सिल्लोडमध्ये राजकीय वातावरण आधीच तापलेलं असताना, या घटनेत शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावात अधिकच भर पडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अंभई गावात धाव घेतली. रात्री १२ च्या सुमारास पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून १५ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

advertisement

गावात सध्या काय परिस्थिती?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अपघातात भाऊ गमावला अन् बदललं जगण्याचं मिशन, अभिनेत्याच्या भावाचं मोठं काम, Video
सर्व पहा

सध्या अंभई गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा तणाव, बकऱ्यांवरुन तुफान राडा; दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल