TRENDING:

Ajit Pawar Death : अपघातात 6 जणांचा मृत्यू, मग प्रत्यक्षात 5 मृतदेह का सापडले?अजितदादांच्या जवळच्या सहकाऱ्याच्या पाच प्रश्नांनी खळबळ!

Last Updated:

Amol Mitkari Ask Questions On Ajit Pawar Suspicious Death : अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला. टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते, मग विसंगती का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Amol Mitkari On Ajit Pawar Suspicious Death : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाल्याचं पहायला मिळतंय. महाराष्ट्राचा दादा माणूस गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठं संकट कोसळलं आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर आता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं पण अजितदादांचे जवळचे सहकारी अमोल मिटकरी यांना अद्याप दु:ख सावरता आलं नाही. अशातच मिटकरी यांनी पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Amol Mitkari Ask Questions On Ajit Pawar Suspicious Death
Amol Mitkari Ask Questions On Ajit Pawar Suspicious Death
advertisement

मन मान्यायला तयार नाहीन

आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची.. सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची. आणि दुसरी आदरणीय दादांची होती, असं अमोल मिटकरी म्हणाले. त्यानंतर त्यांनी मनातली शंका व्यक्त केली.

advertisement

मनात शंकेचं काहूर

मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचं काल समजलं. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामं आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र, हे प्रश्न माझं मन विचारतंय.

advertisement

5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली?

अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते, मग विसंगती का? असंही सवालही अमोल मिटकरी यांनी विचारला आहे. तसेच एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? असा प्रश्नांचा भडिमार अमोल मिटकरी यांनी केला आहे. प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही, असंही मिटकरी यावेळी म्हणाले.

advertisement

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ट्रॅक्टर खरेदीवर मिळतंय अनुदान, लगेच करा अर्ज, कोणती लागतील कागदपत्रे?
सर्व पहा

दरम्यान, मिटकरी यांच्या पोस्टनंतर आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Death : अपघातात 6 जणांचा मृत्यू, मग प्रत्यक्षात 5 मृतदेह का सापडले?अजितदादांच्या जवळच्या सहकाऱ्याच्या पाच प्रश्नांनी खळबळ!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल