TRENDING:

अमरावती सुन्न! दुचाकीवर जाणाऱ्या तरुणीला पाच जणांनी अडवलं, फरफट जंगलात नेऊन आळीपाळीने केले अत्याचार

Last Updated:

पाच नराधमांनी गाडी तरुणीची गाडी अडवली. आरोपींनी आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, त्यानंतर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती :  अमरावती जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेने संपूर्ण विदर्भ हादरला आहे. भररस्त्यात पाच नराधमांनी एका तरुणीवर अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
News18
News18
advertisement

अमरावती जिल्ह्यातील भानखेडा गावाजवळील निर्जन जंगल परिसरात शनिवारी एका १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडिता आणि तिचा मित्र दुचाकीवरून जात असताना पाच जणांच्या टोळीने त्यांना अडवून हा अमानुष प्रकार केल्याचे उघड झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी युद्धपातळीवर तपासाची चक्रे फिरवत पाचही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

advertisement

तरुणीसोबत नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी तिच्या मित्रासोबत दुचाकीने भानखेडा जंगलातील रस्त्यावरून जात होती. यावेळी दबा धरून बसलेल्या पाच नराधमांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी आधी या दोघांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. क्रूरतेचा कळस म्हणजे, पीडितेच्या मित्राच्या खिशातील केवळ 150 रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि त्यानंतर त्यातील एकाने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला. या अघोरी कृत्यानंतर नराधमांनी तिथून पळ काढला.

advertisement

पीडितेची प्रकृती चिंताजनक 

हल्ल्यानंतर आणि अत्याचारानंतर पीडित तरुणीची प्रकृती प्रचंड खालावली असून तिला उपचारासाठी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, फ्रेजरपुरा पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली होती.

पोलिसांनी पाचही जणांना ठोकल्या बेड्या 

advertisement

गुन्हा घडल्याच्या काही तासांतच फ्रेजरपुरा पोलिसांनी पाचही संशयितांना अटक केली आहे. या नराधमांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि या कृत्यामागचा उद्देश काय होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. अमरावतीत या घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी महिला संघटनांकडून होत आहे.

14 वर्षीय मुलीवर तरुणाच्या घरासमोरील अंगणातच अत्याचार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खानापूर गावातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने जबरीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटने नंतर पिडीत मुलीच्या वडिलांनी कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत त्यास ताब्यात घेतले आहे.या घटनेमुळे कारंजा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अमरावती सुन्न! दुचाकीवर जाणाऱ्या तरुणीला पाच जणांनी अडवलं, फरफट जंगलात नेऊन आळीपाळीने केले अत्याचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल