TRENDING:

अशोक खरातने आता 'हर्षद मेहता'लाही टाकलं मागे, बँकेत केलं मोठं कांड, मॅनेजरने पहिल्यांदाच दिली कबुली

Last Updated:

राहाता येथील समता पतसंस्थेत 100 तर सिन्नरच्या कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेत 32 खाती उघडण्यात आली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिर्डी : लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला आरोपी अशोक खरातचे कारनामे काही कमी व्हायचं नाव घेत नाही. दररोज नव नवीन खुलासे होत आहे. अशातच शिर्डीमध्ये जगदंबा पतसंस्थेत अशोक खरातने १३२ खाते उघडल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या खात्यामध्ये अशोक खरातने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला.  धक्कादायक म्हणजे, यापैकी जगदंबा पतसंस्थेत खाते ज्यांच्या नावाने उघडले होते, त्यांचा खातेदाराशी कधी संबंधच आला नव्हता, अशी कबुलीच जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी दिली आहे.
News18
News18
advertisement

शिर्डीमधील अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांच्या प्रकरणी नवीन माहिती आता समोर आली आहे. राहाता येथील समता पतसंस्थेत 100 तर सिन्नरच्या कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेत 32 खाती उघडण्यात आली होती. जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांची चौकशी करण्यात आली.  शिर्डी पोलिसांनी बँक खात्यांसंदर्भात कांडेकरांची चौकशी केली.

सर्व 32 खात्यांना अशोक खरात नॉमिनी होता. या  32 खात्यांमध्ये 2 कोटी 74 लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आला होता.

advertisement

खरातनेच सगळी खाती उघडली

"पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. माझा जबाब लिहून घेण्यात आला. अशोक खरात याची जगदंबा बँकेत २ कोटी ७४ लाखांची रक्कम होती. अशोक खरात याने स्वतः सगळी कागदपत्र देऊन खाती उघडली होती. ती खाती नातेवाईकांची असल्याची सांगितली होती. खरात याने सर्व खात्यांची जबाबदारी घेतली होती.  मात्र ज्यांच्या नावाने खाती उघडली गेली, त्यांचा आणि पतसंस्थेचा कधीच प्रत्यक्ष संबंध आला नाही. अशोक खरात यानेच पैसे टाकले आणि कालांतराने काढून घेतले होते, अशी कबुली जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी दिली.

advertisement

खरातच्या प्रभावाने माझ्याकडून चूक झाली

तसंच,  अशोक खरातने मला माझ्या नातेवाईकांची खाती आहे असं सांगून खाती उघडली होती. खरात आमच्याकडे जाणे येणे होते. त्यामुळे ही खाती उघडली. आधीचे चेअरमन असताना खरात याने सगळे पैसे काढून घेतले होते.  खरात हाच नॉमिनी होता. ते अभ्यासू व्यक्ती होते. खरात आणि आमचे चेअरमन हे कुंदेवाडीचे होते. त्यामुळे ओळखीतून व्यवहार झाला होता अशोक खरातच्या प्रभावामुळे माझ्याकडून चूक झाली. पण आमची फसवणूक झाली आहे. शिर्डी पोलिसांना आता माहिती दिली, पोलीस जसं सांगितली तशी कारवाई केली जाईल, खरातने जी खाती उघडली ती माणसं कधीच माणसं आमच्याकडे आली. त्या खात्यातील पैसे हे खरातनेच काढले होते. खातेदार उपस्थितीत नसताना पैसे काढले गेले. ही माझी ओळखीतून चूक झाली,  अशी कबुली

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी दिली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अशोक खरातने आता 'हर्षद मेहता'लाही टाकलं मागे, बँकेत केलं मोठं कांड, मॅनेजरने पहिल्यांदाच दिली कबुली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल