TRENDING:

Crime News : कुत्र्यांच्या भुंकण्याने फुटलं भांडं! पुण्याला घेलेल्या व्यक्तीचा संभाजीनगरमध्ये....; घडलं काय?

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरातून एका घरफोडीची घटना समोर आलेली आहे. मात्र घडलेला संपूर्ण प्रकार वाचून नक्कीच थरकाप उडल्या शिवाय राहणार नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : पुण्याला कामानिमित्त गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांनी मध्यरात्री धाड टाकत तब्बल 4.17 लाख रुपये रोख, 38.6 तोळे सोन्याचे दागिने आणि 3.5 किलो चांदी असा ऐवज लंपास केला. झांबड इस्टेटजवळील वसंत विहार सोसायटीत ही घटना घडली. मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरांची धांदल उडाली आणि चोरलेल्या मालातील काही पिशव्या रस्त्यात पडल्याने मोठा मुद्देमाल परत मिळाला. या प्रकरणी शनिवारी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
‎टॉमी-कोयत्यासह धाडसी घरफोडी; शेजाऱ्यांच्या सतर्कतेने काही मुद्देमाल परत<br>‎
‎टॉमी-कोयत्यासह धाडसी घरफोडी; शेजाऱ्यांच्या सतर्कतेने काही मुद्देमाल परत<br>‎
advertisement

मध्यरात्री 2 वाजता चोरांनी घातला धुमाकूळ

‎आरोग्य सल्लागार विकास जगताप (वय 76) हे कुटुंबासह वसंत विहार सोसायटीत राहतात. ते 12 फेब्रुवारी रोजी कामानिमित्त पुण्याला गेले होते. दरम्यान 13 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सुमारे 2 वाजता परिसरातील कुत्र्यांच्या भुंकण्याने शेजाऱ्यांना संशय आला. अनिल कुमावत यांच्या पत्नीने सीसीटीव्ही तपासला असता दोन संशयित सोसायटीत शिरताना दिसले. त्यांनी तात्काळ शेजारी प्रशांत दहिवडकर यांना कळवले.

advertisement

कोयता उगारला तरी हटले नाहीत

‎दहिवडकर आणि त्यांची मुले ध्रुव आणि कृष्णा हे तत्काळ बाहेर पडले. जगताप यांच्या घरासमोर जाताच घरातून दोन चोर बाहेर आले. त्यांच्या हातात कोयता आणि टॉमी होता. त्यांनी दहिवडकर यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी तो चुकवला त्यानंतर दोन्ही चोर वेगाने पळ काढू लागले.

advertisement

‎चोरांनी सोसायटीबाहेर एका कारमागे दुचाकी उभी केली होती. मात्र नागरिक जागे झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दुचाकी तशीच सोडून पळ काढला. पोलिसांनी ती दुचाकी जप्त केली असून सीसीटीव्हीत नंबर स्पष्ट दिसू नये म्हणून नंबरप्लेटवर माती फासल्याचे आढळले.

‎जगताप यांच्या तक्रारीनुसार चोरीत 38.6 तोळे सोन्याचे दागिने, 4 लाख 17 हजार रुपये रोख आणि 3.5 किलो चांदीचे दागिने असा ऐवज गेला होता. मात्र पाठलागादरम्यान रस्त्यावर पडलेल्या पिशवीतून 2.62 किलो चांदी, अंदाजे 20 तोळे सोने आणि चार घड्याळे असा मुद्देमाल हस्तगत झाला.

advertisement

‎चोर एकावेळी दोन पिशव्या घेऊन बाहेर पडल्याने त्यांनी मोठा ऐवज चोरल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशांत दहिवडकर आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी लाकडी दांड्यांसह तब्बल 1.5 किलोमीटर पाठलाग केला. सोसायटीच्या सुमारे सात फुटांच्या तीन भिंती ओलांडूनही त्यांनी चोरांचा पिच्छा सोडला नाही. धावाधावीत दोघे चोर एकमेकांना धडकले आणि त्यातील एकाची पिशवी खाली पडली. दहिवडकर यांची मुले जवळ पोहोचताच चोराने पुन्हा कोयता उगारून पिशवी उचलण्याचा प्रयत्न केला; मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून दोघांनीही पलायन केले.

advertisement

पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
400 वर्षांपूर्वीचे मंदिर,असतो शिव पार्वतीचा विवाह सोहळा, इतिहास माहितीये का? ‎
सर्व पहा

‎घटनेची माहिती मिळताच उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी घटनास्थळी भेट दिली. जगताप पुण्यावरून परतल्यानंतर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Crime News : कुत्र्यांच्या भुंकण्याने फुटलं भांडं! पुण्याला घेलेल्या व्यक्तीचा संभाजीनगरमध्ये....; घडलं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल