TRENDING:

हेच 'ते' 5 क्रूर चेहरे, ज्यांनी मित्रासोबत जाणाऱ्या तरुणीवर टाकला हात, अमानुष घटनेनं हादरला महाराष्ट्र!

Last Updated:

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे रोडवर असलेल्या भानखेडा फाटा परिसरात एका १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे रोडवर असलेल्या भानखेडा फाटा परिसरात एका १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मित्रासोबत पायी जाणाऱ्या तरुणीला अडवून पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केला होता. आरोपींनी पीडितेच्या मित्राला अमानुष मारहाण करत, त्याचे हातपाय बांधून हे अमानुष कृत्य केलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. मात्र आरोपींची नावं उघड करण्यास टाळाटाळ केली जात होती. आता अखेर पोलिसांनी अखेर आरोपींची नावं आणि फोटो अधिकृतपणे जाहीर केली आहेत.
अमरावतीत तरुणीवर सामूहिक अत्याचार
अमरावतीत तरुणीवर सामूहिक अत्याचार
advertisement

नेमकी घटना काय होती?

२८ मार्च रोजी रात्री ८ ते साडेनऊच्या दरम्यान ही संतापजनक घटना घडली. पीडित तरुणी आणि तिचा मित्र रस्त्याने जात असताना पाच आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मित्राला दोरखंडाने बांधून त्याला अमानुष मारहाण केली. यानंतर आरोपींनी तरुणीवर पाशवी अत्याचार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

advertisement

आरोपींची नावे आणि अटकेची कारवाई

पोलिसांनी घटनेच्या रात्रीच पाचही आरोपींना शिताफीने अटक केली होती. मात्र, तपासाच्या कारणास्तव किंवा इतर कारणांमुळे पोलीस आरोपींची नावे उघड करत नव्हते. यामुळे अमरावती शहरात तीव्र जनक्षोभ उसळला होता. जनआक्रोशानंतर अखेर पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर केली आहेत. ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे (वय ३४), दीपक मरसकोल्हे (वय २९), प्रमोद नारायण वाघाडे (वय ३९), शुभम उर्फ सोनू नारायण वाघाडे (वय २८) आणि

advertisement

उमेश बेनीराम भोयर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या पाचही आरोपींना शनिवारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आलं आहे.

फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

या अमानवीय कृत्यामुळे जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध सामाजिक संघटना आणि नागरिक रस्त्यावर उतरून आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. "हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यावर फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी आणि या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी," अशी आक्रमक मागणी जोर धरत आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हेच 'ते' 5 क्रूर चेहरे, ज्यांनी मित्रासोबत जाणाऱ्या तरुणीवर टाकला हात, अमानुष घटनेनं हादरला महाराष्ट्र!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल