TRENDING:

अजितदादांकडून विमानतळाची घोषणा, बीडचं स्वप्न पूर्ण होणार, नवे कलेक्टर लगोलग कामाला लागले

Last Updated:

Beed Airport: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या विमानतळाची घोषणा केली होती. कामखेडा येथे नियोजित विमानतळ होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: बीडचा रेल्वे प्रश्न अनेक वर्षे रखडला, मात्र विमानतळाचा प्रश्न प्रलंबित राहणार नाही. आम्ही विमानतळाचा प्रश्न लगोलग मार्गी लावू, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये जाऊन केला. अजित पवार यांच्या घोषणेनंतर बीड जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडून नियोजित विमानतळाची पाहणी करण्यात आली.
बीड जिल्हाधिकारी आणि अजित पवार
बीड जिल्हाधिकारी आणि अजित पवार
advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या विमानतळाची घोषणा केली होती. कामखेडा येथे नियोजित विमानतळ होणार आहे. दीड किलोमीटर लांब आणि 45 मीटर रुंदीची धावपट्टी होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. विमानतळ, रेल्वे तसेच महत्त्वाच्या प्रलंबित कामांना गती देण्यासोबतच विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे बीडला येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

advertisement

बीडचे नूतन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड जवळील कामखेडा येथे नियोजित विमानतळाची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून आढावा देखील घेतला आहे. विमानतळासंदर्भात आवश्यक त्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना केल्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

बीडला विमानतळाची गरज आहे. आजपर्यंत दुर्दैवानं विमानतळ झालं नाही. शेवटी इथं यायचं म्हटलं तर एकतर लातूरला उतरावं लागतं. किंवा नांदेड-संभाजीनगरला उतरावं लागतं. विमानतळाची धावपट्टी असली की मंत्री अधिकाऱ्यांना उतरता येतं. बीडच्या अधिकाऱ्यांशी मी याविषयी बोललोय, लवकरच यासंबंधी आम्ही निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी बीड जिल्हा दौऱ्यावेळी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांकडून विमानतळाची घोषणा, बीडचं स्वप्न पूर्ण होणार, नवे कलेक्टर लगोलग कामाला लागले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल