TRENDING:

बीडच्या माजलगावात सराफा व्यापाऱ्याला ६० लाखांना लुटलं, सोने-चांदीवर डल्ला

Last Updated:

सराफा व्यापाऱ्याच्या मोटरसायकलच्या समोर गाडी लावून कोयता, शस्त्राचा धाक दाखवला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : बीडच्या माजलगाव शहरातून खेडेगावाला व्यापार करण्यासाठी मोटरसायकलवरून जाणाऱ्या सराफा व्यापाऱ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या दुचाकीचा पाठलाग करत शस्त्राचा दाखवत व्यापाऱ्याकडील साडेतीनशे ग्रॅम सोने ज्याची अंदाजे किंमत ५० लाख रूपये असून तीन किलो चांदी ज्याची अंदाजे किंमत १० लाख रुपये आहे.
बीड सराफा व्यावसायिकाला सुटले
बीड सराफा व्यावसायिकाला सुटले
advertisement

दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेने माजलगाव तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. माजलगाव शहरातील हनुमान चौक येथे अमोल पंढरीनाथ गायके यांचे अमोल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आज सकाळी ९ वाजता अमोल गायके माजलगाव शहरातून व्यवसाय करण्यासाठी मोटारसायकलवरून खेडेगावला जात होते. तालखेड फाट्याजवळ त्यांची मोटारसायकल आली असता पाठीमागून अज्ञात चोरटे चार चाकी वाहनातून त्याचा पाठलाग करत आले.

advertisement

सराफा व्यापाऱ्याला ६० लाखांना लुटलं

यावेळी त्यांनी सराफा व्यापाऱ्याच्या मोटरसायकलच्या समोर गाडी लावून कोयता, शस्त्राचा धाक दाखवला. जीवे मारण्याची धमकी दिली. व्यापाऱ्याच्या हातातील सोन्या चांदीची बॅग हिसकावली. ज्यात साडेतीनशे ग्रॅम सोन्याचे अलंकार होते. (ज्याची अंदाजे किंमत ५० लाख रुपये) तर तीन किलो चांदीचे अलंकार ज्याचे अंदाजे किंमत १० लाख रुपये असल्याची माहिती आहे.

advertisement

दिवसाढवळ्या रोडवर दरोडा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जालन्याच्या शेतकऱ्याचा मोठा सन्मान, प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं खास निमंत्रण, Vide
सर्व पहा

अज्ञात चोरट्यांनी लागलीच घटनास्थळावरून पलायन केले. दिवसाढवळ्या घडलेल्या या रोड रॉबरीच्या (दरोडा) घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडच्या माजलगावात सराफा व्यापाऱ्याला ६० लाखांना लुटलं, सोने-चांदीवर डल्ला
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल