सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी ही वादग्रस्त पोस्ट केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे हे चर्चेत राहिले आहेत. बीड पोलीस प्रेस ग्रुपवर त्यांनी शनिवारी एक पोस्ट केली. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीत गणेश मुंडे आणि दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली. त्यानंतर शनिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी बीड पोलिसांच्या ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट केली.
advertisement
गणेश मुंडे यांनी व्हॉट्स अॅप ग्रुपवर काय म्हटले?
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी एसपींच्या अधिपत्याखाली सुरु केलेल्या बीड पोलीस प्रेस या व्हाटस्अप ग्रुपवर शनिवारी सायंकाळी एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी ‘या खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही, मी जर प्रेस घेतली तर’. असे म्हटले आहे. या पोस्टवर काही पत्रकारांनी विचारपूस केल्यानंतर ती वादग्रस्त पोस्ट मुंडे यांनी डिलीट केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी त्यांना ग्रुपमधून बाहेर काढले. त्यामुळे पोलीस अधिकारी असलेल्या गणेश मुंडे यांचा रोख कोणावर होता, खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत त्यांनी भाष्य केले का, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
''तर खासदाराची चड्डी पण राहणार नाही..'' खासदार सोनवणेंनी आरोप केलेला पोलीस अधिकारी संतापला, वादग्रस्त पोस्टचर्चेत
खासदार बजरंग सोनवणे यांनी काय म्हटले होते?
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करत बीडमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली. या मागणीनंतर अनेक गौप्यस्फोट होतील अशी चर्चा रंगली होती.