TRENDING:

नोकरीचे आमिष ठरले ...; सहशिक्षिकेच्या आयुष्याची नराधमाने केली राखरांगोळी, बीडमधील धक्कादायक प्रकार

Last Updated:

Beed News : अंबाजोगाई तालुक्यात नोकरीचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय सहशिक्षिकेवर तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ जे घडलं ते अत्यंत भयंकर होत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : अंबाजोगाई तालुक्यात नोकरीचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय सहशिक्षिकेवर तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पीडित महिलेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मानसिक दबाव टाकण्यात आला होता. अखेर या छळाला कंटाळून पीडितेने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
महिलेवर काही वर्षांपासून अत्याचार
महिलेवर काही वर्षांपासून अत्याचार
advertisement

नोकरीचे आमिष दाखवून पिंजऱ्यात ओढले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मुख्य आरोपी मोहीन बासद शेख याने पीडितेला चांगल्या नोकरीचे आमिष दाखवले. या बहाण्याखाली त्याने तिचा विश्वास संपादन करत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्या खासगी क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ त्याच्याकडे असल्याचे सांगून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत तो सातत्याने तिचे शोषण करत होता.

advertisement

हा अत्याचाराचा प्रकार अनेक वर्षे सुरू असल्याने पीडिता प्रचंड मानसिक तणावाखाली होती. दरम्यान पीडितेच्या पतीला संशय आल्याने त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी मुख्य आरोपीसह त्याचे भाऊ बाबा शेख, इरशाद शेख आणि मोसीन शेख यांनी संगनमत करून पतीला शिवीगाळ केली. तसेच पुन्हा याबाबत विचारणा केली तर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

advertisement

छळाला कंटाळून शिक्षिकेची पोलिसांत धाव

सततच्या धमक्या, अपमान आणि मानसिक छळामुळे अखेर पीडितेने शुक्रवारी (दि.30जानेवारी) अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ट्रॅक्टर खरेदीवर मिळतंय अनुदान, लगेच करा अर्ज, कोणती लागतील कागदपत्रे?
सर्व पहा

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करत असून आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
नोकरीचे आमिष ठरले ...; सहशिक्षिकेच्या आयुष्याची नराधमाने केली राखरांगोळी, बीडमधील धक्कादायक प्रकार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल