TRENDING:

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख प्रकरणी मोठी अपडेट, सरकारने ATR समितीत केला बदल, काही तरी मोठं घडणार?

Last Updated:

संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे आता 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' समितीमध्ये बदल केला आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे आता 'ॲक्शन टेकन रिपोर्ट' समितीमध्ये बदल केला आहे.  ९ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे. न्यायमूर्ती ताहलियानी समितीच्या अहवालाची छाननी करण्यासाठी गृह खात्याच्या अपर मुख्य सचिवांच्या नेतृत्वात ही उच्चस्तरीय समिती कार्यरत आहे. या बदलामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

advertisement

समितीचा अहवाल लवकरच विधिमंडळात सादर केला जाऊ शकतो. दोषींवर कठोर कारवाई आणि भविष्यातील उपाययोजनांचा आराखडा ही समिती तयार करणार आहे. लवकर न्याय मिळावा यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे, अशी भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केल्या.

आता या समितीत कोण? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
50 घरं, पोलिसांची फौज आणि रात्र! बुधवार पेठेच्या दलदलीत 'त्या' रात्री काय घडलं?
सर्व पहा

उच्चस्तरीय समिती अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली काम करत असून यामध्ये प्रधान सचिव (विशेष) आणि अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांसारख्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती एम. एल. ताहलियानी समितीने सादर केलेल्या अहवालातील निष्कर्षांची सखोल छाननी करणे, हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे. संतोष देशमुख यांच्या मृत्यूशी संबंधित अनेक गंभीर बाबी या अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते, ज्यावर आता ही नवीन समिती आपले मत मांडणार आहे. ही समिती जो काही अहवाल सादर करणार आहे, त्याचे आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख प्रकरणी मोठी अपडेट, सरकारने ATR समितीत केला बदल, काही तरी मोठं घडणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल