TRENDING:

Bhiwandi: बॅट चुकून विहिरीत पडली, पाण्यात उतरला पण अंदाज चुकला, तरण्याबांड पोराचा बुडून मृत्यू

Last Updated:

बिलाल अन्सारी (वय २५ वर्षे) याचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नरेश पाटील, प्रतिनिधी, भिवंडी : भिवंडी शहरातील समरू बाग परिसरात आज एक हृदयद्रावक घटना घडली. 25 वर्षीय बिलाल अन्सारी यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करीत आहेत.
भिवंडी तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
भिवंडी तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, बिलाल यांच्या घराच्या शेजारी असलेल्या एका जीन्स कंपनीच्या कंपाउंडमध्ये जुनी विहीर आहे. काही दिवसांपूर्वी बिलालची क्रिकेट बॅट चुकून त्या विहिरीत पडली होती. तीच बॅट पाण्यातून बाहेर काढण्यासाठी बिलाल विहिरीत उतरला असताना हा दुर्दैवी अपघात घडला. घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना देताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उचलली लेखणी, पुण्यात 'हे' पहिल्यांदाच घडतंय, Video
सर्व पहा

पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या भोईवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून, विहिरीभोवती सुरक्षेची काय व्यवस्था होती आणि हा अपघात नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर परिसरात तसेच बिलाल अन्सारी यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhiwandi: बॅट चुकून विहिरीत पडली, पाण्यात उतरला पण अंदाज चुकला, तरण्याबांड पोराचा बुडून मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल