TRENDING:

बीडमध्ये माजी आमदाराच्या घरात घुसून मारहाण, भाजपच्या नेत्यासह 5 जणांना अटक

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घरात घुसून स्वीय सहाय्यकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिविधी बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घरात घुसून स्वीय सहाय्यकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी काल रात्री उशिरा भाजपा नेते बाळराजे पवार यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. गेवराई येथील फार्म हाऊस जवळून रात्री ही अटक करण्यात आली आहे. आज या पाचही जणांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.
News18
News18
advertisement

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्याच्या गेवराई नगरपालिका मतदान प्रक्रिया सुरू असताना अमरसिंह पंडित आणि बाळराजे पवार यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला होता. हा राडा विकोपाला गेल्यानंतर बाळराजे पवारांसह त्यांच्या समर्थकांनी अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना बेदम मारहाण केली होती.

धक्कादायक बाब म्हणजे बाळराजे पवार आणि त्यांच्या समर्थकांनी गेवराईमधील अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई या निवासस्थानी येऊन ही मारहाण केली होती. या मारहाणीत अमृत डावकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात तीन दिवस उपचार करावे लागले होते. पण एका राजकीय नेत्याच्या घरात घुसून त्यांच्या स्वीय सहाय्यकाला अशाप्रकारे मारहाण झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिळे अन्न खाताय? वेळीच थांबवा सवय, नाहीतर हे होतील गंभीर परिणाम
सर्व पहा

आता या प्रकरणाचा सखोल तपास करून गेवराई पोलिसांनी रात्री बाळराजे पवार यांच्यासह इतर पाच जणांना अटक केली आहे. पुढील काही वेळात त्यांना गेवराई येथील न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. बाळराजे पवार हे गेवराई येथील भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता पवार यांचे पती आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारे भाजप नेत्याला अटक झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडमध्ये माजी आमदाराच्या घरात घुसून मारहाण, भाजपच्या नेत्यासह 5 जणांना अटक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल