TRENDING:

Parbhani ZP election Result: भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला 'धुरळा' सिनेमा स्टाईल निवडणूक भोवली, लेक-मुलगा, पुतण्या पराभूत

Last Updated:

भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या घरात ५ जणांना तिकीट मिळालं होतं. पण ४  जण पराभूत झाले असून फक्त पुतण्या काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विशाल माने, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

परभणी : निवडणुका आल्या की कार्यकर्त्याला बाजूला सारून नेते आपल्या कुटुंब आणि नातेवाईकांना तिकिटं देत असल्याचा प्रकार आता नवीन राहिला नाही. पण, नेत्यांच्या या घराणेशाहीला आता मतदारांनी चांगलाच दणका दिला आहे. नगर परिषदेत घराणेशाहीला नाकारल्याचे चित्र पाहण्यास मिळालं. तर परभणी जिल्हा परिषद निवडणुकीतही याची झलक पाहण्यास मिळाली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या घरात ५ जणांना तिकीट मिळालं. पण ४ जण पराभूत झाले आहे.  तर पुतण्या काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाला आहे.  वरपुडकरांच्या घराणेशाहीला कुटुंबाने नाकरलं आहे. भाजपकडून निवडणूक लढवणारे मुलगा, सून आणि पुतण्या पराभूत झाले आहे.

advertisement

परभणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पुन्हा एकदा घराणेशाहीला झुकतं माप देण्यात आलं होतं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर हे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पालिका निवडणुकीत वरपुडकरांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या घरामध्ये मुलगा, सून आणि पुतण्याला तिकीट देण्यात आलं होतं. तर उद्धव ठाकरे गटाकडून मुलगी तर काँग्रेसकडून तिकीट घेऊन वरपुडकर यांचा पुतण्या निवडणूक लढवली. पण, निकालाची मतमोजणी सुरू झाली आणि वरपुडकर कुटुंबाला धक्का बसला आहे.

advertisement

लेक आणि मुलगा पराभूत

शिंगणापूर जिल्हापरिषद सर्कलमधून वरपुडकराचा  मुलगा समशेर वरपूडकर पराभूत  झाला आहे. इथं ठाकरे गटाचे उमेदवार पांडुरंग खिल्लारे ४५० मतांनी विजयी झाले आहे. खिल्लारे हे जाँईंट किल्लर ठरलेआहे.  तर वरपूडकर  यांची मुलगी सोनल देशमुख झरी मतदारसंघांमधून पराभूत झाली आहे.  सोनल देशमुख यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तिकीट घेऊन निवडणूक लढवली होती. इथं भाजपचे उमेदवार दिलीप देशमुख विजयी झाले आहे.

advertisement

वरपुडकर कुटुंब कुठे निवडणूक लढत आहे? 

झरी जिल्हापरिषद सर्कल - वरपुडकर यांची मुलगी सोनल देशमुख ( शिवसेना उद्धव ठाकरे ) V/S दिलीप देशमुख ( भाजप )

लोहगाव जिल्हापरिषद सर्कल - वरपुडकर यांचे दुसरे पुतणे अजित वरपूडकर ( काँग्रेस ) V/S उत्कर्ष वरपूडकर ( भाजप )

दैठणा जिल्हापरिषद सर्कल - वरपुडकर यांची सून प्रेरणा वरपूडकर ( भाजप )V/S ज्योत्स्ना घाडगे ( काँग्रेस )

advertisement

सिंगणापूर जिल्हापरिषद सर्कल - वरपुडकर यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर ( भाजप ) V/S एकनाथ साळवे ( राष्ट्रवादी अजित पवार )

जांब जिल्हापरिषद सर्कल - वरपुडकर यांचे पुतणे संग्राम जामकर ( राष्ट्रवादी अजित पवार ) V/S बाळासाहेब रेंगे ( काँग्रेस )

परभणी जिल्हा परिषद निकाल एकूण जागा 54

आघाडी

भाजप - 3

शिवसेना - 2

राष्ट्रवादी - 4

शिवसेना UBT - 3

काँग्रेस - 2

वंचित -

अपक्ष -

वरपुडकर यांची सर्वपक्षीय घराणेशाही

सुरेश वडपुडकर हे काँग्रेसमधून भाजपमध्ये अलीकडे दाखल झाले. महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी दमदार कामगिरी केली होती. त्यांच्या प्रतिष्ठेचा भाजपला फायदा झाला होता.  त्यामुळे वडपुरकरांना जिल्हा परिषदेसाठी बक्षीस देण्यात आलं. विशेष म्हणजे, भाजपमधून त्यांना तिकीटं मिळाली तर २ तिकीटं काँग्रेस आणि ठाकरे गटातून मिळाली.  सुरेश वरपुडकर यांचे चिरंजीव समशेर वरपुडकर हे सिंगणापूर जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवली. तर त्यांची पत्नी प्रेरणा वरपुडकर या भाजपच्या तिकीटावर दैठणा गटातून निवडणूक लढत आहे.  तर लोहगाव जिल्हापरिषद सर्कलमधून वरपुडकर यांचे दुसरे पुतणे अजित वरपूडकर हे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रवाशांसाठी खुशखबर, मुंबई–पुणे प्रवास होणार सुसाट, मिसिंग लिंकचा मुहूर्त ठरला
सर्व पहा

तर सुरेश वरपुडकर यांची मुलगी सोनल देशमुख या उद्धव ठाकरे गटाच्या तिकीटावर झरी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवली पण पराभव झाला आहे. सोनम देशमुख यांनी अलीकडे ठाकरे गटात प्रवेश केला होता.पक्षात प्रवेश केल्यानंतर तिकीट मिळालं होतं. त्यामुळे एकाच कुटुंबात राहून घरातच सोनम देशमुख यांनी भाजपविरोधात मैदानात उतरल्या होत्या. पण, इथं भाजपच्या उमेदवारानेच सोनम देशमुख यांचा पराभव केला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parbhani ZP election Result: भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला 'धुरळा' सिनेमा स्टाईल निवडणूक भोवली, लेक-मुलगा, पुतण्या पराभूत
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल