TRENDING:

उन्हाळ्यात शरीराला फायदेशीर, बनवा खास बडीशोपचे सरबत, रेसिपीचा संपूर्ण Video

Last Updated:

उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारचे सरबत करून पीत असतो. त्यासोबत आपण रेडिमेड सरबतचे प्रिमिक्स मिळत असतात त्याचं देखील सरबत करत असतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपण वेगवेगळ्या प्रकारचे सरबत करून पीत असतो. त्यासोबत आपण रेडिमेड सरबतचे प्रिमिक्स मिळत असतात त्याचं देखील सरबत करत असतो. उन्हाळ्यासाठी तुम्ही घरच्या घरी सरबताचे प्रिमिक्स कसे करू शकता ते सुद्धा कुठल्याही प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह न वापरता आणि अगदी झटपट बनवून तयार होतं आणि एकदम टेस्टी लागतं. तर आज आपण बघणार आहोत की खास बडीशेपचे सरबत कसे करायचे याची रेसिपी.
advertisement

‎यासाठी लागणारे साहित्य

एक छोटी वाटी बडीशेप, त्यानंतर एक वाटी भरून आपली खडीसाखर, सात ते आठ मिरी, थोडसं काळे मीठ, चार ते पाच पुदिन्याची पाने आणि दोन लिंबाच्या फोडी एवढे साहित्य याकरता लागणार आहे.

सरबत कसे करायचं

सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीशेप टाकून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये खडीसाखर जी घेतलेली आहे ती टाकून घ्यायची, काळी मिरी टाकायची, त्याच्यानंतर थोडसं काळे मीठ टाकायचं. तुम्ही साधे मीठ टाकले तरी सुद्धा चालू शकते आणि याला मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचंय, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बडीशेपचा दाणा राहता कामा नये. एकदम बारीक असं हे झालं पाहिजे. अशा पद्धतीने तुमचं हे प्रिमिक्स बनवून तयार होतं. तुम्ही याला एक महिना देखील फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि याच्यापासून तुम्ही इन्स्टंट सरबत देखील करू शकता.

advertisement

एका ग्लासमध्ये पुदिन्याची पाने घ्यायची, लिंबाच्या फोडी टाकून त्याला बारीक करून घ्यायचे. त्यामध्ये चार ते पाच आईस क्यूब टाकायचे आणि थंडगार पाणी टाकायचं. साधारणपणे यामध्ये तुम्ही एक ते दीड चमचा एका कपासाठी आपण जे तयार केलेलं प्रिमिक्स आहे ते टाकून घ्यायचं आणि एकजीव करायचं. याला पाच मिनिटे रेस्ट करायला ठेवून द्यायचं. त्यानंतर हे सरबत आहे ते गाळून घ्यायचं. त्याकरता की जर यामध्ये बडीशेपचे काही दाणे राहिले असतील तर ते पितांना आपल्याला लागू नये म्हणून. अशा पद्धतीने हे सरबत बनवून तयार होतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळी सुट्ट्यांत फिरायला जाण्यासाठी खरेदी करा बॅग्स, किंमत 50 रुपयांपासून, हे ठिकाण माहितीये?
सर्व पहा

तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे झटपट होणारे प्रिमिक्स आणि सरबत घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला देखील खूप आवडेल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन्हाळ्यात शरीराला फायदेशीर, बनवा खास बडीशोपचे सरबत, रेसिपीचा संपूर्ण Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल