आरोग्यासाठी हेल्दी, झटपट तयार करा चण्याच्या पिठाचा पोळा, रेसिपीचा संपूर्ण Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
चण्याच्या पिठाचा पोळा हा असा एक उत्तम पर्याय आहे, जो कमी वेळात तयार होतो आणि शरीराला आवश्यक प्रोटीन आणि पोषण देतो.
मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट, चविष्ट आणि हेल्दी पदार्थांची गरज सगळ्यांनाच असते. चण्याच्या पिठाचा पोळा हा असा एक उत्तम पर्याय आहे, जो कमी वेळात तयार होतो आणि शरीराला आवश्यक प्रोटीन आणि पोषण देतो. हलका, पचायला सोपा आणि विविध भाज्यांसोबत बनवता येणारा हा पोळा नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी परफेक्ट आहे.
चण्याच्या पिठाचा पोळा साहित्य
1 कप चण्याचं पीठ (बेसन)
1/2 कप पाणी (गरजेनुसार)
1 बारीक चिरलेला कांदा
1 लहान टोमॅटो (बारीक चिरलेला)
1-2 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
2 टेबलस्पून कोथिंबीर
1/4 टीस्पून हळद
1/2 टीस्पून लाल तिखट
चवीनुसार मीठ
1/2 टीस्पून जिरं
थोडं तेल / तूप (शेकण्यासाठी)
चण्याच्या पिठाचा पोळा कृती
एका भांड्यात चण्याचं पीठ घ्या. त्यात पाणी घालून गाठी न राहता मध्यम घट्ट पीठ तयार करा. आता त्यात कांदा, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ आणि जिरं घाला. सगळं छान मिक्स करा. तवा गरम करून हलकं तेल लावा. तयार पीठ तव्यावर घालून पसरवा (डोश्यासारखा). दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या.
advertisement
टिप्स:
तेल कमी वापरा किंवा नॉन-स्टिक तवा वापरा. जास्त प्रोटीनसाठी त्यात थोडं ओट्स पीठ किंवा पनीर घालू शकता.
सर्व्ह करताना दही किंवा हिरवी चटणीसोबत खा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 3:20 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
आरोग्यासाठी हेल्दी, झटपट तयार करा चण्याच्या पिठाचा पोळा, रेसिपीचा संपूर्ण Video









