मुंबई महानगर पालिकेत पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेससोबत युती केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या पुढाकाराने वंचितसोबत बसून आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. रविवारी आघाडीची घोषणा झाल्यावर मुंबई काँग्रेस नेत्यांनी एकत्र बसून उमेदवारांच्या नावांवर चर्चा करून शिक्कामोर्तब केले.
काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी
advertisement
काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी
काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी
काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी
काँग्रेसची पहिली यादी
आमदार अस्लम शेख आणि खासदार हंडोरे यांच्या मुलाला उमेदवारी
काँग्रेस पक्षाच्या यादीत दोन नेत्यांच्या कुटुंबियांच्या नावांचा समावेश आहे. खासदार चंद्रकांत हंडोरे यांची लेक प्रज्योती हंडोरे यांना प्रभाग क्रमांक १४० मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आमदार अस्लम शेख यांचा मुलगा आणि बहिणीला देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सोमवारी रात्री उशिरा काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता
सोमवारी रात्री एबी फॉर्म देऊन मंगळवारी काँग्रेसचे उमेदवार अर्ज दाखल करतील. काँग्रेसची दुसरी उमेदवारी रात्री सोमवारी रात्री प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
