TRENDING:

BMC: मुंबई महापालिकेत सत्तेवर येताच महायुतीचा मोठा निर्णय, ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडणार!

Last Updated:

Mumbai Mahapalika Budget: मुंबईतील पायाभूत सुविधांसाठी तसेच विकास कामांसाठी महापालिकेच्या एकूण ८१ हजार ४४९ कोटी रुपयांच्या ठेवींपैकी ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेत सत्तेवर येताच महायुतीने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांसाठी तसेच विकास कामांसाठी महापालिकेच्या एकूण ८१ हजार ४४९ कोटी रुपयांच्या ठेवींपैकी ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे. सेना-भाजपने घेतलेल्या निर्णयामुळे मोठा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिका-महापौर रितू तावडे
मुंबई महापालिका-महापौर रितू तावडे
advertisement

मुंबई महापालिकेच्या एकूण ठेवी ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपये शिल्लक आहेत. पैकी ४४ हजार ८२६ कोटी २३ लाख रुपये बांधील दैतवापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला तोडता येणार नाहीत. मात्र उर्वरित ३६ हजार ६२३ कोटी ०९ लाख रूपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे.

मुंबईकरांच्या सर्वांगीण विकासासाठी ठेवी मोडण्याचे महायुतीचे धोरण

advertisement

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सत्ताकाळात महापालिकेने मोठ्या प्रमाणावर ठेवी वाढवल्या. मात्र ठेवींचा सर्वसामान्यांना फायदा होत नसेल तर अशा ठेवी काय चाटायच्या आहेत का? असा सवाल महापालिका निवडणुकीच्या प्रचार काळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारला होता. आता महापालिकेत सत्तेत आल्यावर भारतीय जनता पक्षाने शिंदेसेनेच्या साथीने तब्बल ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी वाहतूक प्रकल्प, शालेय इमारतींचे बांधकाम, रस्ते, पूल बांधणी अशा विविध विकास कामांसाठी ठेवी मोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

advertisement

भाजप सेनेच्या निर्णयावर ठाकरे सेनेच्या किशोरी पेडणेकरांची सडकून टीका

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ऑस्ट्रेलियन मास्टरशेफ शो पाहिला, वयाच्या साठीत बनल्या शेफ, बिझनेसमधून कमाईच कमाई
सर्व पहा

आमच्या सत्तेचा कार्यकाळ संपला त्यावेळी ९१ हजार कोटींच्या ठेवी ठेवून आम्ही निघालो आहोत. मुंबई महापालिकेवर प्रशासक आल्यानंतरही त्यांनी ठेवींना हात घातला. आता विकासाच्या नावाखाली महापालिकांच्या ठेवींवर डल्ला मारण्याचे यांचे नियोजन आहे. प्रशासकीय राज असताना ठेवींचे काय केले, किती कोटींच्या ठेवी मोडल्या आदी प्रश्नांसंबंधी आम्ही श्वेतपात्रिका काढण्याची मागणी केली होती. मात्र वेबसाईटवर जावून पाहा, असे उत्तर आम्हाला देण्यात येते. आताही ठेवी मोडण्याचा आमचा विरोध असेल, असे शिवसेना ठाकरे पक्षाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC: मुंबई महापालिकेत सत्तेवर येताच महायुतीचा मोठा निर्णय, ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल