TRENDING:

Housing Society : तीन अपत्य असणाऱ्या सभासदाला...., हाऊसिंग सोसायटीबाबत उच्च न्यायालयाने दिलेला 'तो' निकाल काय आहे?

Last Updated:

Housing Society : गृहनिर्माण सोसायटी निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने २०२४ मध्ये दिला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गृहनिर्माण सोसायटी निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने २०२४ मध्ये दिला होता. तीन अपत्य असलेल्या सदस्याला यापुढे सोसायटीची निवडणूक लढवता येणार नाही.असा निर्णय दिला. न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्या एकलपीठाने हा निर्णय देत उपनिबंधकांच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले होते.
Housing Society
Housing Society
advertisement

काय आहे न्यायालयाचा निर्णय?

न्यायालयाने स्पष्ट केलं की, दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तीला गृहनिर्माण सोसायटीच्या पदासाठी अपात्र ठरवण्याची तरतूद नियमांमध्ये आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणात उपनिबंधकांनी दिलेला निर्णय योग्य असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

काय होतं संपूर्ण प्रकरण?

चारकोप परिसरातील एकता नगर को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष पवनकुमार नंदकिशोर सिंह यांनी आपल्या निवडीला आव्हान देणाऱ्या तक्रारीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. सोसायटीतील काही सदस्यांनी सिंह यांना तीन अपत्ये असल्याचा आरोप करत त्यांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली होती.

advertisement

उपनिबंधकांचा निर्णय

तक्रारीची दखल घेत उपनिबंधकांनी सिंह यांना अपात्र ठरवले होते. या निर्णयाविरोधात सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सहकार कायद्यात अशा प्रकारची स्पष्ट तरतूद नसल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला होता.

न्यायालयातील युक्तिवाद काय होता?

सिंह यांनी आपल्या याचिकेत तीनपैकी एक अपत्य स्वतःचे नसल्याचा दावा केला. संबंधित मुलगा केवळ शिक्षणासाठी आपल्या घरी राहत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर न्यायालयाने त्या मुलाचा जन्मदाखला सादर करण्याचे आदेश दिले.

advertisement

पुराव्याअभावी दावा फेटाळला होता

मात्र सिंह हे संबंधित मुलाचा जन्मदाखला सादर करू शकले नाहीत. उलट त्यांच्या रेशनकार्डवर त्या मुलाचे नाव असल्याचे आढळून आले. यावरून तो मुलगा त्यांचाच असल्याचे स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.

अंतिम निर्णय काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने उपनिबंधकांचा निर्णय योग्य ठरवत सिंह यांची याचिका फेटाळली. तसेच दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना सोसायटीच्या पदासाठी अपात्र ठरवण्याचा नियम वैध असल्याचेही स्पष्ट केले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Housing Society : तीन अपत्य असणाऱ्या सभासदाला...., हाऊसिंग सोसायटीबाबत उच्च न्यायालयाने दिलेला 'तो' निकाल काय आहे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल