TRENDING:

Valentine Day च्या आदल्या रात्री रक्ताची होळी! लफड्याचा घरच्यांना सुगावा लागला अन् प्रेमातून रक्तरंजित कांड

Last Updated:

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात एका अल्पवयीन मुलाने आपल्या प्रेयसीच्या वडिलांवर आणि काकांवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात एका अल्पवयीन मुलाने आपल्या प्रेयसीच्या वडिलांवर आणि काकांवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर समज द्यायला घरी बोलवण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या वादानंतर मुलाने थेट चाकूहल्ला केला. या हल्ल्यात तरुणासह मुलीचे वडील आणि काका जखमी झाले आहेत. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
प्रातिनिधीक फोटो
प्रातिनिधीक फोटो
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र, १२ फेब्रुवारीच्या रात्री या मुलाने मुलीला फोन केला. योगायोगाने तो फोन मुलीच्या वडिलांनी उचलला आणि प्रेमप्रकरणाचे बिंग फुटलं. हा प्रकार समजल्यानंतर मुलीच्या वडिलांनी हे प्रकरण सामोपचाराने मिटवण्यासाठी आणि मुलाला समज देण्यासाठी त्याला आपल्या घरी बोलावलं.

advertisement

मुलीच्या वडिलांनी केवळ मुलाला घरी बोलावलं होतं, पण तो मुलगा घरी एकटा आला नाही. त्याने आपल्यासोबत आपला भाऊ आणि एका मित्राला बरोबर घेतलं. सुरुवातीला बोलणं सुरू असताना वादावादी वाढली. रागाच्या भरात असलेल्या या अल्पवयीन प्रेमवीराने आपल्याकडे असलेला चाकू काढला आणि मुलीच्या वडिलांवर आणि काकांवर सपासप वार केले. या हल्ल्यात मुलीचे वडील आणि काका गंभीर जखमी झाले आहेत.

advertisement

दोन्ही बाजूचे लोक जखमी

हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही बाजूंनी हाणामारी सुरू झाली. या झटापटीत तो अल्पवयीन मुलगादेखील जखमी झाला. जखमी झालेल्या वडिलांना आणि काकांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी मुलगादेखील जखमी झाला असून त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत.

पोलिसांत गुन्हा दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, आले अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

या घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलासह त्याच्या भावाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Valentine Day च्या आदल्या रात्री रक्ताची होळी! लफड्याचा घरच्यांना सुगावा लागला अन् प्रेमातून रक्तरंजित कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल