वाहतूक कधी बंद राहणार?
मंगळवार दि. 10 ऑक्टोबर ते गुरुवार दि. 12 ऑक्टोबर पर्यंत दुपारी 12 ते 3.30 या काळात महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. तसेच 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 3 दरम्यान पर्यायी मार्गाचा विचार करावा लागणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास खलसे यांनी माहिती दिलीय.
advertisement
धक्कादायक! छ. संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात गेल्या 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू
काय असणार पर्यायी मार्ग?
छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. या काळात पर्यायी मार्गासाठी महामार्गावरील जालना इंटरचेंज ते सावंगी इंटरचेंज दरम्यान समृद्धी महामार्गावरून नागपूरकरडून मुंबईकडे जाणारी वाहतूक, निधोना (जालना) इंटरचेंजमधून बाहेर पडून निधोना एमआयडीसीमार्गे राष्ट्रीय महामार्ग 753 अ जालना- छत्रपती संभाजीनगरमार्गे केंब्रिज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करून शिर्डीकडे रवाना होईल.
सावधान! छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक नियम मोडताय? आधी दंडाची रक्कम पाहा
शिर्डीहून नागपूरकडे जाणारी वाहतूक
समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक सावंगी इंटरचेंज येथून बाहेर पडून पर्यायी मार्गानेच विरुद्ध दिशेने असणार आहे. पुढे निधोना जालना इंटरचेंज येथे महामार्गावर प्रवेश करून नागपूरकडे रवाना होईल, असे खलसे यांनी सांगितले.