धक्कादायक! छ. संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात गेल्या 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात गेल्या 24 तासांमध्ये 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर, 3 ऑक्टोबर, सिद्धार्थ गोदाम : नांदेडच्या रुग्णालयातील मृतांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. ही घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात गेल्या 24 तासांमध्ये 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये छत्रपती संभाजी नगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटीमध्ये तब्बल 18 जणांच्या मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यावर रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आलं आहे. औषधांच्या तुटवड्याने किंवा डॉक्टरांच्या कमतरतेमुळे, हालगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले नसून, यातील अनेक जण हे मरणासन्न अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल झाले होते, अशी माहिती डीन संजय राठोड यांनी दिली आहे.
advertisement
रुग्णांचा मृत्यू कशामुळे झाला? 
1)हृदय विकाराच्या झटक्याने - 2 मृत्यू
2)निमोनियाने - 2 मृत्यू
3)किडनी निकामी झाल्याने -3 मृत्यू
4)लिव्हर निकामी झाल्याने -1 मृत्यू
5)लिव्हर आणि किडनी दोन्ही निकामी -1 मृत्यू
6)विष प्राशन केल्याने -1मृत्यू
7)रस्ता अपघात -1 मृत्यू
8)अपेंडिक्स पोटात फुटून पू झाल्याने -1 मृत्यू.
9)वजन कमी असल्याने प्रि मॅच्युअर नवजात बालक - 2 मृत्यू.
advertisement
10) ब्रेनडेड - 4 मृत्यू
नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? 
हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे, अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधपुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयातून पुढे आला आहे. तिथे 31 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यात गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा केला आहे. शिवाय रुग्ण गंभीर होते असे स्पष्टीकरण दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
धक्कादायक! छ. संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात गेल्या 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement