advertisement

Mumbai : वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते बीकेसी प्रवास होणार सुसाट,35 मिनिटांचा वेळ वाचणार; नेमका कधी होणार खुला?

Last Updated:

Mumbai News : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील कनेक्टर आर्म सुरू झाल्यानंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते बीकेसी प्रवास अधिक जलद होणार आहे. या मार्गामुळे तब्बल 35 मिनिटांचा वेळ वाचणार असून हा मार्ग कधी खुला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WEH to BKC travel time reduced by SCLR connector
WEH to BKC travel time reduced by SCLR connector
मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा प्रवास सुसाट होणार आहे. मात्र यात समोर आलेली नेमकी अपडेट कोणती आहे आणि प्रवाशांचा नेमका किती वेळ वाचणार आहे.
35 मिनिटांच्या कोंडीतून सुटका
सांताक्रूझ–चेंबूर लिंक रोड वरील बहुप्रतीक्षित कनेक्टर आर्मचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. हा कनेक्टर वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्ग आणि मुंबईतील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलाला थेट आणि जलद जोडण्यासाठी उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या बीकेसीकडे जाण्यासाठी वाहनचालकांना मोठ्या वळणांचा आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतहा कार्यालयीन वेळेत या मार्गांवर प्रचंड गर्दी दिसून येते. मात्र SCLR वरील हा नवा कनेक्टर सुरू झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावरून थेट बीकेसीत प्रवेश करणे अधिक सोपे आणि वेळ बचत करणारे ठरणार आहे. जे अंतर थेट 30 ते 35 मिनिटांनी कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
महापालिका आणि संबंधित यंत्रणांकडून या कनेक्टर आर्मचे काम युद्धपातळीवर सुरू असून पूल, रॅम्प, संरक्षक भिंती तसेच रस्त्यावरील शेवटची डांबरीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्याचबरोबर सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरील चिन्हे आणि सुरक्षेसंबंधी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे.
सांताक्रूझ–चेंबूर ट्रॅफिक कोंडीला लागणार ब्रेक
हा कनेक्टर सुरू झाल्यानंतर कुर्ला, सांताक्रूझ, वांद्रे आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. दररोज बीकेसीत कामासाठी जाणाऱ्या हजारो वाहनचालकांचा प्रवास वेळ कमी होईल तसेच इंधनाचीही बचत होणार आहे. एकूणच सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील हा कनेक्टर आर्म मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचा बदल घडवणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते बीकेसी प्रवास होणार सुसाट,35 मिनिटांचा वेळ वाचणार; नेमका कधी होणार खुला?
Next Article
advertisement
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल, इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल
  • 2008 पेक्षाही महाभयंकर आर्थिक संकट दारात

  • गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा

  • नव्या भविष्यवाणीने जग हादरलं

View All
advertisement