Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कोंडीचं 'दुष्टचक्र'! जुन्या रांगा संपल्या नाहीत तोच पुन्हा लांबच लांब रांगा, आता काय कारण?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
वीकेंड आणि सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या वाहनांची संख्या अचानक वाढल्याने पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
(अनिस शेख,प्रतिनिधी) पुणे: गॅस टँकरच्या अपघातानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील जनजीवन नुकतेच पूर्वपदावर येत असतानाच, आता 'विकेंड रश' मुळे प्रवाशांना पुन्हा एकदा महाकोंडीचा सामना करावा लागत आहे. वीकेंड आणि सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या वाहनांची संख्या अचानक वाढल्याने पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे, कोणताही अपघात झालेला नसताना केवळ अतिगर्दी आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे हा 'ट्रॅफिक जॅम' झाला आहे.
वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय
पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची प्रचंड संख्या लक्षात घेता, महामार्ग पोलिसांनी खंडाळा घाटात मोठी कसरत सुरू केली आहे. कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी मुंबईकडे येणाऱ्या लेनवर काही काळासाठी 'ब्लॉक' घेतला असून, मुंबईची एक मार्गिका पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मोकळी करून देण्यात आली आहे. या 'बायपास' पद्धतीमुळे रखडलेली वाहतूक संथ गतीने पुढे सरकत आहे.
advertisement
कोंडीचे मुख्य कारण काय?
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज एक्सप्रेसवेवर कोणताही अपघात झालेला नाही. मात्र, विकेंडमुळे वाहनांचा ओघ प्रचंड वाढला आहे. त्यातच अनेक वाहनचालक घाईघाईत लेनची शिस्त मोडत असल्यामुळे आणि ओव्हरटेकिंगच्या प्रयत्नात असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. खंडाळा आणि बोरघाटात वाहनांचा मोठा बॅकलॉग तयार झाला आहे.
प्रवाशांसाठी ताजी अपडेट
advertisement
सध्या वाहतूक पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तासांत वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत प्रवाशांनी संयम बाळगून लेनमध्येच वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 8:48 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कोंडीचं 'दुष्टचक्र'! जुन्या रांगा संपल्या नाहीत तोच पुन्हा लांबच लांब रांगा, आता काय कारण?










