TRENDING:

Sambhajinagar News : घरासमोरील कचऱ्याचा वादाच टोकाशी गेला; पोटच्या गोळ्याचा दुर्दैवी अंत; नेमक काय घडलं?

Last Updated:

Sambhajinagar Shocking Incident : घरासमोरील कचऱ्याच्या वादातून छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला असून आरोपींचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : घरासमोरील कचरा टाकण्याच्या कारणावरून सुरू झालेला किरकोळ वाद थेट गंभीर गुन्ह्यात रुपांतरित झाल्याची धक्कादायक घटना शहरात समोर आली आहे. घरमालकीण, तिचा मुलगा आणि सून यांनी गर्भवती भाडेकरू महिलेच्या पोटात लाथ मारल्याने तिचा गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात तिघांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी फेटाळून लावला आहे.
घरासमोरील कचऱ्यावरून वादाचा कळस; गर्भवती भाडेकरू महिलेला लाथ मारल्याने गर्भपात
घरासमोरील कचऱ्यावरून वादाचा कळस; गर्भवती भाडेकरू महिलेला लाथ मारल्याने गर्भपात
advertisement

‎शाहेदा बेगम अनिस खान (वय 45), मोसीन खान अनिस खान (वय 28) आणि राणी खान मोसीन खान (वय 22, सर्व रा. कुरेशी पॅलेस, बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.

‎या प्रकरणी करिश्मा नदीम खान (वय 26) यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  तक्रारीनुसार करिश्मा खान या मागील नऊ महिन्यांपासून पती आणि चार मुलांसह कुरेशी पॅलेस परिसरात भाड्याच्या खोलीत राहत आहेत. घरमालकीण शाहेदा बेगम खान या वारंवार घरातील बेकरीचा कचरा फिर्यादीच्या खोलीसमोर टाकत असल्याने दोघांमध्ये सतत वाद होत होता.

advertisement

गर्भवती महिलेचं घरपणच उध्वस्त झालं

‎15 जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घरमालकीणने पुन्हा खोलीसमोर कचरा टाकल्याने करिश्मा खान यांनी त्याबाबत जाब विचारला. त्यावरून शाहेदा बेगम खान हिने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचवेळी तिचा मुलगा मोसीन खान आणि सून राणी खान तेथे आले. तिघांनी मिळून फिर्यादी महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे.

advertisement

दरम्यान शाहेदा बेगम खान यांनी गर्भवती असलेल्या करिश्मा खान यांच्या पोटात जोरात लाथ मारली. त्यामुळे त्या खाली कोसळल्या. त्यानंतर वैद्यकीय तपासणीत करिश्मा खान यांचा गर्भपात झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video
सर्व पहा

‎घटनेनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना, गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार असून गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे अटकपूर्व जामीन नाकारावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.‎

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sambhajinagar News : घरासमोरील कचऱ्याचा वादाच टोकाशी गेला; पोटच्या गोळ्याचा दुर्दैवी अंत; नेमक काय घडलं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल