TRENDING:

सुट्टीच्या दिवशी पोहायला गेले पण घात झाला, हर्सूल तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल तलावामध्ये 4 तरुणांचा बुडून मृत्यू झाला असून रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पोहण्यासाठी तरूण गेले असल्याची माहिती मिळते आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी शहरातील हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
चार तरूण बुडाले
चार तरूण बुडाले
advertisement

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज रविवारची सुट्टी असल्याने काही तरुण मौजमजेसाठी आणि पोहण्यासाठी हर्सूल तलावावर गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही जण खोल पाण्यात बुडाले. स्थानिकांनी आणि बचाव पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले, परंतु दुर्दैवाने या तरुणांचे प्राण वाचवता आले नाहीत.

या भीषण दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या दोन तरुणांची नावे समोर आली आहेत. अफान खान इरफान खान (वय १७ वर्षे) आणि आदिल मोहसीन शेख (वय १६ वर्षे) यांच्यासह अन्य दोन जणांचाही बुडून मृत्यू झाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

हे सर्व तरुण अल्पवयीन असल्याने आणि सुट्टीच्या दिवशी ही घटना घडल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हर्सूल तलाव परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते, मात्र सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचे स्थानिक सांगतात.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुट्टीच्या दिवशी पोहायला गेले पण घात झाला, हर्सूल तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल