TRENDING:

Sambhajinagar ZP Election Result 2026: संभाजीनगरात गेम पलटला, भाजपपेक्षा शिंदे वरचढ, ठाकरे किंगमेकर, कोण कुठे आघाडीवर?

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar ZP Election Result 2026 Live:  छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतल्यानंतर शिंदेंनी त्यांना ओव्हर टेक केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Chhatrapati Sambhajinagar ZP Election Result 2026 Live:  छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ६२ गटांसह पंचायत समितीच्या १२४ गणांचा निकाल आज स्पष्ट होणार असून आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत कोण जिंकणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. महानगर पालिका निवडणुकीत इथं भाजपनं मोठं यश संपादन केलं होतं. ११५ पैकी ६८ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेला देखील भाजप चांगली कामगिरी करेल, असं अपेक्षित होतं. मात्र आता संभाजीनगरात गेम पलटला आहे. इथं शिवसेना शिंदे गटाने भाजपला ओव्हर टेक केलं आहे.

advertisement

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या ६३ पैकी ३३ जागांवरील सुरुवातीचे कल हाती आले आहेत. त्यानुसार इथं गेम पलटताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गट संभाजीनगरमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. सध्याच्या घडीला इथं शिवसेना शिंदे गटाने १२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने १० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यानंतर ठाकरे गट तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरत असून ठाकरेंना ६ जागा मिळताना दिसत आहेत.

advertisement

संभाजीनगर जिल्हा परिषदेचा आतापर्यंतचा निकाल (63/33)

भाजप : 10

शिवसेना : 12

शिवसेना UBT: 6

NCP : 1

NCP SP ; 1

काँग्रेस : 1

वंचित : 00

MIM: 1

अपक्ष :1

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 2017 मध्ये सर्वाधिक 23 जागा जिंकूनही भाजपाला सत्तेपासून रोखण्यात शिवसेना-काँग्रेस हे पक्ष यशस्वी ठरले होते. आता महापालिका निवडणुकीत भाजपनं जबरदस्त कमबॅक केलं आहे. भाजपनं सर्वाधिक ५८ जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर आता 2026 मध्ये झालेल्या झेडपी निवडणुकीत भाजपला फटका बसताना दिसत आहे.

advertisement

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत युती तुटल्यानंतर शिवसेना-भाजपने जुळवून घेत जिल्हा परिषदेसाठी युतीची घोषणा केली होती. सिल्लोड-सोयगाव हा आमदार अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ वगळता इतर तालुक्यात दोन्ही पक्षाची युती झाली होती. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत बऱ्याच घडामोडी घडल्या. अनेक तालुक्यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युती नको, अशी भूमिका घेतली. त्यामुळे इथं भाजप शिवसेनेची युती फक्त कागदावर राहिली.

advertisement

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडत असून, यासाठी एकूण ९ ठिकाणी मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर प्रशासनाने आवश्यक मनुष्यबळ, ईव्हीएम यंत्रणा आणि पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

फुलंब्री तालुक्यात १८ टेबलांवर २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, यासाठी १२५ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कन्नड येथे टपाली मतपत्रिकांसाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले असून, एकूण ६६ टेबलांवर मतमोजणी केली जाणार आहे. सिल्लोड तालुक्यात १८ टेबलांवर मतमोजणी होईल; येथे ५४ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

वैजापूर तालुक्यात १८ ते २३ टेबलांवर मतमोजणी होणार असून, प्रत्येक फेरीस सरासरी २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागेल. प्रत्येक गटाचा निकाल जाहीर होण्यासाठी साधारण अर्धा तास लागणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील मतमोजणी केंद्रे

फुलंब्री : तहसील कार्यालय परिसर

कन्नड : शिवाजी महाविद्यालय, इनडोअर स्टेडियम

सिल्लोड : शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय

वैजापूर : विनायकराव पाटील महाविद्यालय

पैठण : जायकवाडी पायथ्यावरील संतपीठ

खुलताबाद : कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था

छत्रपती संभाजीनगर : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय

गंगापूर : मुक्तानंद महाविद्यालय, इनडोअर स्टेडियम

सोयगाव : तहसील कार्यालयाची नवी इमारत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मानव संस्कृतीचे दुर्मिळ पुरावे, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात अनोखा ठेवा
सर्व पहा

मतमोजणीदरम्यान उमेदवारांना केंद्राच्या आत प्रवेश देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sambhajinagar ZP Election Result 2026: संभाजीनगरात गेम पलटला, भाजपपेक्षा शिंदे वरचढ, ठाकरे किंगमेकर, कोण कुठे आघाडीवर?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल