TRENDING:

Ration Card : रेशन कार्डमधून नाव कमी करायचे आहे का? मग घरबसल्या या पद्धतीने ५ मिनिटांत करा काम

Last Updated:

Ration Card : सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वस्त दरात अन्नधान्य मिळावे यासाठी केंद्र सरकारकडून रेशन कार्डची सुविधा दिली जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वस्त दरात अन्नधान्य मिळावे यासाठी केंद्र सरकारकडून रेशन कार्डची सुविधा दिली जाते. या रेशन कार्डवर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे नोंदवलेली असतात आणि त्या आधारे धान्याचे वाटप केले जाते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यसंख्येनुसार मिळणाऱ्या लाभात बदल होत असतो.
Ration Card
Ration Card
advertisement

काळानुसार कुटुंबातील परिस्थिती बदलत असल्याने रेशन कार्डवरील नावे अपडेट करणे आवश्यक ठरते. अनेक वेळा नवीन सदस्यांचे नाव जोडावे लागते, तर काही वेळा एखाद्या सदस्याचे नाव कमी करणे गरजेचे होते. विशेषतः मुलगी लग्नानंतर सासरी गेल्यास तिचे नाव माहेरच्या रेशन कार्डमधून काढावे लागते. तसेच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांचे नाव हटवणे आवश्यक असते.

advertisement

रेशन कार्डवरील नाव कमी करण्याची गरज

रेशन कार्ड सामान्यतः कुटुंबातील मुख्य व्यक्तीच्या नावावर असते आणि त्यात इतर सदस्यांची नावे समाविष्ट असतात. मात्र, कुटुंबातील सदस्यसंख्येत बदल झाल्यास चुकीच्या माहितीवर लाभ घेणे टाळण्यासाठी नाव कमी करणे महत्त्वाचे ठरते. यामुळे योग्य लाभ योग्य व्यक्तींना मिळतो.

ऑनलाइन पद्धत

रेशन कार्डवरील नाव कमी करण्यासाठी सरकारने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी नागरिकांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करावे लागते. त्यानंतर रेशन कार्डची माहिती भरून ‘नाव बदल/काढा’ या पर्यायावर क्लिक करावे लागते. पुढे संबंधित व्यक्तीचे नाव निवडून ते काढण्याचे कारण नमूद करावे लागते आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचे नाव रेशन कार्डमधून वगळले जाते.

advertisement

ऑफलाइन पद्धत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

ऑनलाइन सुविधा न वापरणाऱ्या नागरिकांसाठी ऑफलाइन पर्यायही उपलब्ध आहे. यासाठी संबंधित व्यक्तीने आपल्या जवळच्या अन्नधान्य पुरवठा कार्यालयात जावे लागते. तेथे अर्ज भरून ज्या व्यक्तीचे नाव काढायचे आहे त्यासंबंधित कागदपत्रे सादर करावी लागतात. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असते. तसेच इतर कारणांसाठी संबंधित पुरावे द्यावे लागतात. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अधिकृत नोंदींमध्ये बदल करण्यात येतो.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ration Card : रेशन कार्डमधून नाव कमी करायचे आहे का? मग घरबसल्या या पद्धतीने ५ मिनिटांत करा काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल